Aflatoon Marathi Comedy Movie Released on 21 July  Saam TV
मनोरंजन बातम्या

Upcoming Marathi Movie : सिद्धार्थ जाधव - जॉनी लिव्हरसह दमदार कास्ट असलेला ‘अफलातून’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Aflatoon Poster : ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Saam Tv

Aflatoon Marathi Comedy Movie : जी गोष्ट आपल्याकडे नाही ती आपल्याला हवीशी वाटणं साहजिक आहे. पण त्याची खंत न करता नसलेल्या गोष्टीला आपली ताकद बनवून तीन जिवलग डिटेक्टिव्ह मित्र ज्यातल्या एकाला बघता येत नाही, एकाला ऐकू येत नाही आणि एक बोलू शकत नाही. असे हे तिघे एका प्रकरणाचा छडा कशा मजेशीर प्रकारे लावतात याची धमाल दाखवणारा ‘अफलातून’ हा मराठी चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा, चित्रपटाचे निर्माते आहेत. ग्रुप एम मोशन एंटरटेन्मेन्ट, अवधूत डिस्ट्रिब्युटर आणि स्वर्ण पटकथा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अफलातून’ चित्रपटाची सहनिर्मिती करण्यात आली आहे. (Latest Entertainment News)

या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. पोस्टरवरून अफरातफरीची गडबड लक्षात येते आहे. पण ही अफरातफरी नेमकी कसली आहे? आणि कशारीतीने ती सोडवली जाणार? याचा धमाल अनुभव देणार ‘अफलातून’ हा चित्रपट आहे. एका अशक्य केसची अफलातून स्टोरी, पडद्यावर बघायला नक्की गंमत येणार आहे.

श्री, आदि आणि मानव या तीन डिटेक्टिव्ह मित्रांची ही गोष्ट असून फसवल्या गेलेल्या दुर्देवी मारिया नावाच्या मुलीला मदत करण्याचा विडा हे तिघे उचलतात. ही मदत करताना येणाऱ्या अडचणीवर ते कसे मात करतात? याची रंजक कथा ‘अफलातून’ चित्रपटात पहायला मिळणार आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव, जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा, रेशम टिपणीस, अशी कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आहेत.

‘अफलातून’ चित्रपटाची कथा-पटकथा परितोष पेंटर यांची असून संवाद संदीप दंडवते यांचे आहेत. छायांकन सुरेश देशमाने तर संकलन सर्वेश परब याचे आहे. मंदार चोळकर याने लिहिलेल्या गीतांना अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांचे स्वरसाज लाभला आहे. संगीत आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी संगीतकार कश्यप सोमपुरा यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाच्या संगीताचे हक्क सारेगामाकडे आहेत. नृत्यदिग्दर्शन रंजू वर्गीस यांचे आहे. वेशभूषा मीनल डबराल गज्जर हिची असून कलादिग्दर्शन नितीन बोरकर यांचे आहे. वितरणाची जबाबदारी ए .ए फिल्म्स ने सांभाळली आहे. मंगेश जगताप, सेजल पेंटर, शीला जगताप, अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी, डॉ. झारा खादर सहनिर्माते आहेत. ऑनलाईन निर्माते अवधूत डिस्ट्रीब्युटर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT