Lagna Kallol Movie First Look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lagna kallol Movie: मयुरी-सिद्धार्थ-भूषणचा 'लग्नकल्लोळ'मधील फर्स्ट लूक, कोणाच्या गळ्यात पडणार वरमाला?

Siddharth Jadhav Movie Lagna Kallol: काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. पण आता त्यांच्या लूकवरील पडदा हटवण्यात आला आहे.

Priya More

Lagna Kallol Movie First Look:

मराठी सिनेसृष्टीचा प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav), भूषण प्रधान (Bhushan Pradhan) आणि मयुरी देशमुखच्या (Mayuri Deshmukh) ‘लग्नकल्लोळ’ चित्रपटाची (Lagna Kallol Movie) घोषणा झाल्यापासून त्याची चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे एक जबरदस्त मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये भूषण प्रधान, मयुरी देशमुख आणि सिद्धार्थ जाधव पाठमोरे दिसत होते. पण आता त्यांच्या लूकवरील पडदा हटवण्यात आला आहे. या तिन्ही कलाकारांचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.

मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटातील सिद्धार्थ, मयूरी आणि भूषण यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. मयुरी देशमुख, सिद्धार्थ जाधव आणि भूषण प्रधान हे तिघेही मुंडावळ्या बांधून वरमाला हातामध्ये घेऊन सज्ज झाल्याचे दिसत आहे. पण भूषण आणि सिद्धार्थ या दोघांपैकी कोण मयुरीच्या गळ्यात ही वरमाला घालणार याचे गुपित १ मार्चला उलगडणार आहे.

‘लग्नकल्लोळ’ चित्रपटातील या कलाकारांच्या फर्स्ट लूकच्या माध्यमातून त्यांचे या चित्रपटातील पात्र देखील सांगण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये भूषण प्रधान हा अथर्वच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ जाधव हा मारूतीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मयूरी देशमुख ही श्रृतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. या तिन्ही कलाकारांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या चित्रपटातील त्यांची भूमिका आणि फर्स्ट लूक शेअर केला आहे.

या चित्रपटाच्या टीमने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या तिन्ही कलाकारांचा फर्स्ट लूक शेअर करत त्यावर सुंदर कॅप्शन दिले आहे. भूषण प्रधानचा फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'सनई चौघडे वाजू लागले, नाचू लागले वराती. सात फेरे घेण्यासाठी आता काही क्षणांचा अवधी. बाशिंग बांधून तयार हा नवरदेव अथर्व म्हणजेच अभिनेता भूषण प्रधान.' मयुरी देशमुखचा फर्स्ट लूक शेअर करत कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, 'आपलं लग्न अगदी धूमधडाक्यात व्हावं असं सगळ्यांचं स्वप्न असतं. पण एकदा की दोनदा ?? भेटूया नवऱ्यामुलीच्या भूमिकेत बोहल्यावर चढलेल्या अभिनेत्री मयुरी देशमुखला ...'

तर, सिद्धार्थ जाधवचा फर्स्ट लूक शेअल करत कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, 'DJ वाल्याची तयार Playlist, Hall पण झाला बुक. घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी नवऱ्या मुलाचा लुक...नवरदेव मारुतीच्या भूमिकेत भेटा अभिनेता 'सिद्धार्थ जाधव'ला' या तिन्ही कलाकारांच्या फर्स्ट लूकला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. दरम्यान, मयुर तिरमखे फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे निर्माते आहेत. तर मोहम्मद एस. बर्मावाला आणि डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे दिग्दर्शित 'लग्न कल्लोळ' या चित्रपटाचे लेखन जितेंद्रकुमार परमार यांनी केले आहे. हा चित्रपट 1 मार्च 2024 ला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malegaon Blast Case : दहशतवाद कधीच भगवा नव्हता; मालेगाव बॉम्बस्फोट मुख्यमंत्र्यांसहित कोण काय म्हणालं?

sakhee Gokhale: अभिनेत्री सखी गोखलेबद्दल या गोष्टी कोणालाच माहित नाही

Pomegranate : डाळिंब सोलण्याची भन्नाट युक्ती, एकदा नक्कीच ट्राय करुन पाहा

Marathi Movie: 'पालतू फालतू' मध्ये दिसणार सुबोध-रिंकूची मिश्किल झलक; 'बेटर-हाफची लव्हस्टोरी' चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित

KDMC : केडीएमसी ६५ बेकायदा इमारत प्रकरण; न्यायालयाच्या आदेशानंतरही कारवाई नाही, दाखल करणार अवमान याचिका

SCROLL FOR NEXT