Yudhra Release Date SAAM TV
मनोरंजन बातम्या

Yudhra Release Date : 'युध्रा' ची रिलीज डेट आऊट, सिद्धांत चतुर्वेदीचा किलर लूक पाहून चाहते चकीत

Siddhant Malhotra Look : सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन यांच्या आगामी चित्रपट 'युध्रा' ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. यासोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर्सची झलकही दाखवून चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

Shreya Maskar

बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) त्याच्या आगामी 'युध्रा' या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्यासोबत मालविका मोहनन दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, निर्मात्यांनी 'युध्रा' (Yudhra ) ची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासोबतच चित्रपटाच्या नवीन पोस्टर्सची झलक पाहायला मिळाली आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे.

एका पोस्टरमध्ये, सिद्धांत चतुर्वेदी रक्तात भिजलेला आणि दृढनिश्चयाने भरलेला दिसत आहे. त्यांच्या डोळ्यात एक आग आहे. 'युध्रा' मध्ये तुम्हाला जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या पोस्टरमध्ये सिद्धांत आणि मालविका मोहनन (Malavika Mohanan) एकत्र पोज करताना दिसत आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन यांची दमदार केमिस्ट्री पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

सिद्धांत चतुर्वेदीने चित्रपटासाठी घेतले ट्रेनिंग

सिद्धांत चतुर्वेदी 'युध्रा' ॲक्शन भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या भूमिकेसाठी त्यांने ट्रेनिंग घेतले आहे. सिद्धांतने एमएमए, किकबॉक्सिंग आणि जिउ-जित्सुचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. विशेष म्हणजे तो पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर धमाकेदार ॲक्शन करताना दिसणार आहे. तसेच मालविका मोहनचा हा पहिला हिंदी चित्रपट आहे.

युध्रा कधी होणार रिलीज?

सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन यांच्या 'युध्रा' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहे. युध्रा हा एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनला आहे. रवी उय्याद्वार दिग्दर्शित 'युध्रा' चित्रपट 20 सप्टेंबर 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT