8 Don 75 Movie Trailer  Saam Tv
मनोरंजन बातम्या

8 Don 75 Movie: अवयवदाननाचे महत्व सांगणाऱ्या '८ दोन ७५: फक्त इच्छाशक्ती हवी!'चा ट्रेलर रिलीज

Shubhankar Tawde And Sanskruti Balgude: या चित्रपटामध्ये अवयवदानासारखा अत्यंत गंभीर विषय मांडण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (8 Don 75 Movie Trailer Released) करण्यात आला आहे.

Priya More

8 Don 75 Movie Trailer Out:

२०२३ हे वर्ष मराठी सिनेरसिकांसाठी खूपच खास ठरले. या वर्षात मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी अनेक दमदार चित्रपट प्रदर्शित झाले. आता या नव्या वर्षात (New Year) देखील सामाजिक विषयांवर आधारित अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. यापैकी एक चित्रपट म्हणजे '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी!' (8 Don 75 Movie) या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. या चित्रपटामध्ये अवयवदानासारखा अत्यंत गंभीर विषय मांडण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज (8 Don 75 Movie Trailer Released) करण्यात आला आहे. हा चित्रपट येत्या १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

८ दोन ७५' : फक्त इच्छाशक्ती हवी! हा चित्रपट देहदानासारख्या महत्त्वाच्या विषयावर आधारित आहे. देहदान केल्यास मृत्यूनंतर आपले अवयव अन्य गरजू रुग्णांच्या कामी येऊ शकतात हा विचार चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीनं मांडण्यात आल्याचे चित्रपटाच्या ट्रेलरमधून दिसून येत आहे. त्याशिवाय वैद्यकीय शिक्षणावरही या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. या चित्रटामध्ये अत्यंत महत्वाचा विषय मनोरंजक पद्धतीने मांडण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहून तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तर येत्या १९ जानेवारीला मिळणार आहेत.

उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे आणि सुधीर कोलते यांनी ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्माती केली आहे. तर सुश्रुत भागवत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथा लेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी सांभाळली आहे.

अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांच्यासह शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी पुष्कर श्रोत्री हे कलाकार या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे गीत लेखन वैभव जोशी यांनी केले आहे. अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन केले आहे. अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार या चित्रपटानं मिळवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT