Marathi Horror Movie Thakabai Poster Launch  Saam TV
मनोरंजन बातम्या

Marathi Horror Movie : सावधान.... थकाबाई येत आहे! शुभंकर तावडेच्या हॉरर चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

Thakabai Poster Launch : ‘थकाबाई’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच झाले आहे.

Pooja Dange

Shubhankar Tawade Horror Movie : मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहायला मिळतात. सध्या बॉक्स ऑफिसवर बाईपण भारी देवा या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. तर मराठी चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. अशातच बॉक्स ऑफिसवर नवनवीन चित्रपटांची भर पडत आहे. ‘थकाबाई’ या हॉरर चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

रसहस्यमयी आणि गूढ चित्रपटांना मराठी प्रेक्षक कायमच पसंती देतात. असाच एक रहस्यमयी चित्रपट नवोदित दिग्दर्शक युवीन कापसे घेऊन येत आहेत. ‘थकाबाई’ असं या चित्रपटाचं नाव असून या नावातच रहस्य आहे. या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च नुकतेच बांद्राच्या शॉ किया या शोरूममध्ये पार पडले. शुभंकर तावडे आणि हेमल इंगळे या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील.

‘थकाबाई’ चित्रपटाचे पोस्टर त्याच्या विषयासारखेच रहस्यमयी आहे. पोस्टरवर शुभंकर तावडेचा एक भयावह लूक त्याच्या उग्र हावभावांसह दिसत आहे. तर हेमल इंगळे रहस्याचा शोध घेणाऱ्या मुलीच्या भूमिकेत दिसत आहे. (Latest Entertainment News)

तिच्या हातात कंदिल असून ती जंगलात काहीतरी शोधतेय असे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. ‘सत्य की असत्य थकाबाई जाणे रहस्य’ या नावामुळे नक्की चित्रपटात काय असेल, थकाबाई म्हणजे नक्की कोण? आणि तिचं काय रहस्य आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

सुनील जैन प्रस्तुत आणि दीवा सिंह, युवीन कापसे निर्मित ‘थकाबाई’ चित्रपटाच्या पोस्टर लॉन्च प्रसंगी अजय गेही, दानिश अल्फाज, जयकुमार नायर, आमीर सिकंदर, मुदसिर भट, प्रतिक्षा मिश्रा,उमेश घळसासी, मकरंद उपाध्याय, नामदेव कापसे आदी मान्यवर उपस्थित होते.

शुंभकर तावडेने फ्रेशर्स या झी युवावरील मालिकेतून त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर त्याने चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्याने रिंकू राजगुरसह कागर या चित्रपटातून पदार्पण केले.

तर सध्या बाईपण भारी देवासह सिद्धार्थ जाधव, पारितोष पेंटर आणि जयेश ठक्कर यांचा अफलातून हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

SCROLL FOR NEXT