Shubhaman Gill and Sara Ali Khan Saam TV
मनोरंजन बातम्या

अरेच्चा, ही सारा तेंडुलकर नाहीच, शुबमन गिल तर 'त्या' सारासोबत डिनर डेटवर!

शुबमनला आता अभिनेत्री सारा अली खान आवडू लागली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खान(Sara Ali Khan) जितकी तिच्या चित्रपट आणि कामामुळे चर्चेत असते तितकीच ती तिच्या लव्ह लाईफ आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. वृत्तानुसार, 'लव आज कल'(Love Aaj Kal) चित्रपटातील को-स्टार, अभिनेता कार्तिक आर्यनला डेट केल्यानंतर आता सारा पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, सारा आता एका युवा क्रिकेटपटूला डेट करत आहे आणि दोघेही 'डिनर डेट'वर एकत्र दिसले होते.

काही काळापासून साराचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती एका क्रिकेटपटूसोबत डिनर करताना दिसली होती. सारा क्रिकेटर शुबमन गिलला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. कारण त्याच्यासोबतचे साराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या या दोघांपैकी कोणीही या वृत्ताला दुजोरा दिला नाही किंवा या वृत्ताला पूर्णपणे नाकारले नाही.

याआधी शुबमन गिल देखील सिंगल नव्हता. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि शुबमन गिल यांच्याबाबत जोरदार चर्चा होती. काही दिवसांपूर्वी सारा आणि शुबमनमध्ये ब्रेकअप झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. आता असे बोलले जात आहे की, शुबमनला आता अभिनेत्री सारा अली खान आवडू लागली आहे.

सारा आणि शुबमनचा फोटो व्हायरल होताच इंटरनेटवर त्यावर जोक्स आणि मीम्स बनवले जाऊ लागले. शुबमनला 'सारा' हे नाव खूप आवडले आहे आणि तो हे नाव सोडू इच्छित नाही, अशा कॉमेंट नेटकरी करत आहेत. आधी त्याचे नाव सारा तेंडुलकरशी आणि आता सारा अली खानशी जोडले जात आहे.

सारा आणि शुबमनचा फोटो व्हायरल होताच इंटरनेटवर त्यावर जोक्स आणि मीम्स बनवले जाऊ लागले. शुबमनला 'सारा' हे नाव खूप आवडले आहे आणि तो हे नाव सोडू इच्छित नाही, अशा कॉमेंट नेटकरी करत आहेत. आधी त्याचे नाव सारा तेंडुलकरशी आणि आता सारा अली खानशी जोडले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: पुण्याला रेड अलर्ट, घाट भागात कोसळधार; हवामान विभागाचा अंदाज

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT