sharddha kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरचे एक्स अकाउंट हॅक? विचित्र पोस्टमुळे चाहते चिंतेत, शाळेतील फोटोही व्हायरल

Shraddha Kapoor X Account : श्रद्धा कपूरने तिच्या एक्स अकाउंटवर एक विचित्र पोस्ट केली आहे, त्यामुळे चाहते चिंतेत आहेत. चाहते विचारत आहेत की श्रद्धाचे X अकाउंट पुन्हा हॅक झाले आहे का?

Shruti Vilas Kadam

Shraddha Kapoor: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूरचे एक्स अकाउंट हॅक झाले आहे का? हा प्रश्न सध्या तिच्या प्रत्येक चाहत्याच्या मनात घोळत आहे. याचे कारण आहे श्रद्धाने केलेली एक विचित्र ट्वीट. 25 मार्चच्या रात्री श्रद्धाने एक विचित्र पोस्ट केली, त्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. तिने जे लिहिले, त्याचा अर्थ कोणालाच समजत नाहीये.

श्रद्धा कपूरने रात्री १० वाजून १८ मिनिटांनी "Easy $28. GG!"... असे ट्वीट केले. या ट्वीटवर युजर्सचे अनेक कमेंट्स येत आहेत. लोक विचारत आहेत की तिचे अकाउंट हॅक झाले आहे का? तर काहींनी प्रश्न केला की अशी विचित्र पोस्ट का केली?

श्रद्धा कपूरच्या पोस्टचा अर्थ असा तर नाही ना?

काही युजर्सनी AI Grok ला श्रद्धाच्या या संदेशाचा अर्थ विचारला. "श्रद्धा कपूरच्या 'Easy $28. GG' चा अर्थ असा आहे की तिने एखाद्या गेम किंवा रिवॉर्ड अॅपमधून $28 कमावले असतील आणि 'GG' म्हणजे 'गुड गेम', म्हणजेच ती गेममध्ये जिंकली आहे.

दरम्यान, एक्सवर श्रद्धा कपूरचे शाळेतील दिवसांचे फोटो व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की श्रद्धा इतक्या वर्षांत अजिबात बदलली नाही. ती आजही शाळेतील दिवसांसारखीच दिसते. काहींनी तिच्या स्किन रुटीन आणि तरुण दिसण्याचे रहस्य विचारायला सुरुवात केली आहे. काहींनी तर म्हटले की श्रद्धाला जणू 'फाउंटेन ऑफ यूथ' सापडला आहे. मात्र, श्रद्धाने तिच्या एक्स अकाउंटवर याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'गोकुळ'ची निवडणूक बिनविरोध नाहीच? बिनविरोधला सतेज पाटलांचाही विरोध

Burning Feet: पायाचे तळवे अचानक गरम होतात, 'या' ३ आजारांचे असू शकते लक्षण

Maharashtra News Live Update: ठाणे शहरातील चिंतामणी चौकातील एका दुकानाला भीषण आग

राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील दोन दिग्गज महिला नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

विधान परिषद निवडणुकीआधी भाजपची नवी रणनीती; बावनकुळे,मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT