Shraddha Kapoor - Eetha  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shraddha Kapoor - Eetha : तैयार हो, आ रही है 'ईठा'; श्रद्धा कपूरची ठसकेबाज लावणी पाहून प्रेक्षकांची विकेट पडली, चित्रपटात मराठी अभिनेत्याची वर्णी|VIDEO

Eetha Teaser : श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाच्या टीझरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटात मराठी कलाकारही पाहायला मिळणार आहेत.

Shreya Maskar

'ईठा' चित्रपटाचा टीझर रिलीज

चित्रपटात मराठी कलाकार झळकणार

विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत श्रद्धा कपूर

लक्ष्मण उतेकरांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'ईठा' सध्या चांगलाच चर्चेत आहे. 'ईठा' चा अधिकृत टीझर काल रिलीज झाला. हा चित्रपट लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आहे. श्रद्धा कपूरने चित्रपटात विठाबाईंची भूमिका साकरली आहे. चित्रपटाचे दोन पोस्टरही समोर आले आहेत. ज्यात श्रद्धा कपूरचा कातिल अंदाज पाहायला मिळत आहे. 'ईठा' च्या टीझरला भरभरून प्रेम मिळत आहे.

'ईठा' च्या टीझरमध्ये श्रद्धा कपूरची ठसकेबाज लावणी पाहायला मिळत आहे. नऊवारी साडी, पायात घुंगरू, केसांत गजरा घालून श्रद्धा कपूर बेभान होऊन नाचताना दिसत आहे. गर्भावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात असतानाचे दृश्य पाहून अंगावर काटा येतो. विठाबाईंना लावणी सुरू असताना प्रसूती कळा येतात. त्या स्टेजमागे जाऊन बाळाला जन्म देतात आणि पुन्हा स्टेजवर येऊन लावणी सादर करतात. श्रद्धा कपूरने 'ईठा' चित्रपटाचे पोस्टर शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, "तैयार हो, आ रही है ईठा"

'ईठा' स्टारकास्ट

श्रद्धा कपूरसोबत 'ईठा' चित्रपटात अनेक मोठे कलाकार पाहायला मिळणार आहे. बलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि मोहम्मद जीशान अय्यूब हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'ईठा' मध्ये एका मराठी अभिनेत्याची वर्णी लागली आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून सिद्धार्थ जाधव आहे. जो ढोलकी वाजवताना दिसत आहे. मात्र त्याच्या भूमिकेचे नाव अद्याप समोर आले नाही. मात्र टीझरमध्ये सिद्धार्थ जाधवला पाहून चाहते खूपच खुश झाले आहेत. चित्रपटात नाना पाटेकरही दिसणार असल्याचे बोले जात आहे.

'ईठा' कधी रिलीज होणार?

'ईठा' हा चित्रपट २८ ऑगस्टला रिलीज होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'ईथा' चित्रपटाचे शूटिंग नाशिक, सातारा येथे झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT