Eetha movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Eetha movie: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; 'जी जी रे जी' गाण्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

Eetha movie: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' चित्रपटातील 'जी जी रे जी' गाण्याने आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळवले आहे. पुण्यात शेकडो महिलांनी एकत्रित लावणी सादर करत अनोखा विक्रम केला.

Shruti Vilas Kadam

Eetha movie: बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्या तिच्या आगामी 'ईठा' (Itha) या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात श्रद्धा महाराष्ट्राच्या प्रसिद्ध लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 'ईठा'ने मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चित्रपटातील 'जी जी रे जी' या पहिल्याच गाण्याची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली आहे. पुण्यात शेकडो महिलांनी एकत्र येत या गाण्यावर डान्स करत हा अनोखा विक्रम घडवला.

पुण्यात महिलांनी सादर केली लावणीची हुक स्टेप

'ईठा' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यातील झील युनिव्हर्सिटीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर उपस्थित होते. यावेळी पारंपरिक नऊवारी परिधान करुन 517 महिला आणि मुलींनी 'जी जी रे जी' या गाण्यावर डान्स केला. एक मिनिट महिलांनी हे नृत्य सादर केले. या अनोख्या उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली. या कार्यक्रमाला आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्सचे प्रतिनिधीही उपस्थित होते. त्यांनी विक्रमाची अधिकृत घोषणा केली. तसेच मॅडॉक फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कठपुतली क्रिएशन्स महाराष्ट्र यांना सन्मानित करण्यात आले.

श्रद्धाचा नऊवारी साडीतील मराठमोळा अंदाज

या खास कार्यक्रमात श्रद्धा कपूरने हिरव्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती. पारंपरिक दागिने आणि कोल्हापुरी चपलांनी तिने आपला मराठमोळा लूक पूर्ण केला होता. तिच्या या लूकची सोशल मीडियावरही चर्चा होत आहे. यावेळी श्रद्धाने स्वतः मंचावर येत 'जी जी रे जी' गाण्याची हुक स्टेप सादर केली.

श्रद्धाने गाण्यासाठी घेतली होती प्रचंड मेहनत

'जी जी रे जी' हे गाणे १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाले होते. या गाण्याच्या तयारीसाठी श्रद्धाने प्रचंड मेहनत घेतल्याचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सांगितले. लावणीचा सराव करताना श्रद्धाने प्रत्येक पायात चार किलो वजनाचे घुंगरू बांधले होते. सततच्या सरावामुळे तिच्या पायांना सूज आली आणि स्नायूंनाही दुखापत झाली. त्यामुळे तिला जवळपास महिनाभर विश्रांती घ्यावी लागली होती. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन प्रसिद्ध कोरिओग्राफर वैभवी मर्चंट यांनी केले आहे.

कधी प्रदर्शित होणार 'ईठा'?

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'ईठा' हा चित्रपट ४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्राच्या तमाशा आणि लावणी कलेतील दिग्गज कलाकार विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. श्रद्धासोबतच रणदीप हुड्डा, सिद्धार्थ जाधव आणि झीशान अय्युब हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी शेंदुर्णीत कडकडीत बंद

Water Shortage : ठाणे महापालिकेचा भोंगळ कारभार! पाणी नसल्याने डायलिसिस थांबवले; ७ रुग्णांना उपचाराविनाच पाठवले घरी

Gas Stove Vastu: किचनमध्ये गॅस शेगडीसमोर खिडकी असावी की नसावी? वास्तूशास्त्र काय सांगतं?

Ladki Bahin Yojana : १,५०० रुपये खात्यात कधी जमा होणार? लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी

Health Tips : रोज सकाळी भिजवलेल्या भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरात होतात 'हे' ७ बदल; हृदयापासून ते झोपेपर्यंत मिळतात अनेक फायदे

SCROLL FOR NEXT