Country of Blind You tube
मनोरंजन बातम्या

Country of Blind: काश्मीरच्या स्थानिक कलाकारांची कमाल; आंधळे बनवून 'कंट्री ऑफ ब्लाइंड'ला उतरवलं ऑस्करच्या शर्यतीत

Kashmir Movie : H.G. वेल्सच्या कांदबरीत १९०४ चं साल दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात काश्मीरमधील स्थानिक कलाकारांनी काम केलं आहे. सिनेसमीक्षकांना हा चित्रपट आवडला असून त्यांनी ऑस्करच्या नामांकनासाठी याची शिफारस केलीय.

Bharat Jadhav

Country of Blind Race For Oscars:

लॉस एंजेलिस काश्मीरमध्ये बनलेल्या एका चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. येथील सिनेलाउंजमध्ये स्क्रीनिंग झाल्यानंतर या सिनेमाची मोठी क्रेझ वाढली असून सर्वजण या चित्रपटाची चर्चा करत आहे. हा चित्रपट आहे, ‘कंट्री ऑफ ब्लाइंड. हा चित्रपट संपूर्णपणे काश्मीरमध्ये चित्रित करण्यात आलाय. H.G वेल्सच्या कादंबरीवर हा सिनेमाची कहाणी आधारित आहे. सिनेसमीक्षकांना हा चित्रपट आवडला असून त्यांनी ऑस्करच्या नामांकनासाठी याची शिफारस केलीय. (Latest News)

यावर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्कर लायब्ररीच्या पर्मनंट कोअर कलेक्शनमध्ये पटकथेला आधीच प्रतिष्ठित स्थान मिळाले होते, तेव्हा अकादमीचे सदस्य ऑस्कर नामांकनासाठी हा सिनेमा पाठवण्यात यावा असं म्हणत आहेत. या चित्रपटात काश्मीरमधील स्थानिक कलाकारांनी काम केलं आहे. अहमद हैदर, मीर सरवर आणि हुसेन खान यांच्यासमवेत काश्मीरमध्ये जन्मलेल्या हिना खान आणि शोएब निकाश शाह यांनी प्रमुख भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहत काझमी यांनी केले आहे आणि तारिक खान यांनी निर्मिती केली आहे, दोघेही पूचच्या सुरनकोट येथील आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

H.G. वेल्सच्या कांदबरीत १९०४ चं साल दाखवण्यात आलं आहे. यात नुनेझ नावाच्या एका पात्राला एका खोऱ्यात अंध समुदायाची कंट्री ऑफ द ब्लाइंड वस्ती सापडते. या खोऱ्यातील अंध व्यक्तींना बाहेर जग निरर्थक वाटंत. चित्रपटाची काहणी प्रेम कथेत रुपांतरीत होते. नायक असलेल्या नुनेझ पात्र मदिना-सरोतेच्या प्रेमात पडतो.

परंतु नुनेझ पाहू शकत होता त्यामुळे तिच्या वडिलांचा त्यांच्या प्रेमाला नकार असतो. त्यांच्यामते नुनेझला दृष्टी असणं हे शाप आहे. तर नुनेझ दोन जगांमध्ये वावरणारा व्यक्ती आहे. तो अशा जगात राहतो जेथे सर्व लोक अंध आहेत. दुसरं जगं हे बाहेरचं असतं, जेथे सर्व लोक साधारण जीवन जगणारे असतात. तो त्या जगात जाण्याच्या प्रयत्नात असतो. त्याचा काय निर्णय असतो. ते तो का ते करतो, त्याच्या नशिबात काय असते हीच स्टोरी या सिनेमाची आहे.

चित्रपटाची कथा समाजातील विविधता या संकल्पनांचा अभ्यास करते. समाजात असलेली अपंगाच्या व्याख्येला आव्हान देते. हे सामान्यतेचे स्वरूप आणि सामाजिक धोरणं आपल्या कल्पनांवर कसा प्रभाव पाडतात. हे या चित्रपटात मांडण्यात आलंय. चित्रपटात नुनेझची द्विधा मनस्थिती दाखवण्यात आलीय. अंध समाजाची वेगळी संस्कृती स्वीकारावी का ज्या जगातून तो आलाय त्या जगात त्याने परत जावे, या द्विधा स्थितीत नायकाला दाखवण्यात आले आहे.

अमेरिकेतील प्रेक्षकांना या चित्रपटाने भुरळ घातलीय. नुकत्याच झालेल्या स्क्रिनिंगला उपस्थित असलेल्या अकादमी सदस्यांनी चित्रपटाची प्रशंसा केली. त्यांनी हा चित्रपट ऑस्करच्या नामांकनासाठी पाठवण्यात यावा, अशी इच्छा व्यक्त केली. दरम्यान हा चित्रपट आता भारतात अधिकृत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या ९६ व्या अकादमी पुरस्कारांत हा सिनेमा प्रदर्शित होईल. गोल्डन ग्लोब विजेते आणि चित्रपट निर्माते, सिद्दीक बर्माक यांनी या चित्रपटाचे कौतुक केलंय. हा चित्रपट एक "मोहक" सिनेमॅटिक अनुभव आहे.

“कंट्री ऑफ ब्लाइंड हा एक मंत्रमुग्ध करणारा चित्रपट आहे. या चित्रपटात प्रेम स्वातंत्र्याचा संघर्ष, राहण्याचा किंवा सोडण्याचा निर्णयामुळे आणि अंधत्व आणि दृष्टी यांच्यातील अथक संघर्ष प्रेक्षकांना चिंतेत पाडतं, अशी प्रतिक्रिया बर्मक यांनी चित्रपट पाहिल्यानंतर दिली. अमेरिकन मनोरंजन उद्योग क्षेत्राकडून मिळालेला प्रतिसाद माझ्यासाठी खूप मोलाचा असल्याचं चित्रपट निर्माते राहत काझमी म्हणाले.

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर झालेल्या प्रश्नोत्तरांच्या वेळी चित्रपट निर्मात्याने ही प्रतिक्रिया दिलीय. रूपक, प्रेमकथा आणि साहस यांचा मेळ घालणारा, कंट्री ऑफ ब्लाइंड हा प्रकल्प मला अनेक वर्षांपासून करायचा होता,असंही काझमी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT