Manisha Kayande On Bigg Boss OTT 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss OTT 3 : ‘बिग बॉस ओटीटीमध्ये सर्व मर्यादा ओलांडल्या...’, महिला नेत्या मनिषा कायंदेंनी शुटिंग थांबवण्याची केली मागणी

Manisha Kayande On Bigg Boss OTT 3 : शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी ‘बिग बॉस ओटीटी ३’ ची शुटिंग थांबवण्याची विनंती पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Chetan Bodke

‘बिग बॉस ओटीटी’चा तिसरा सीझन कमालीचा चर्चेत आला आहे. युट्यूबर अरमान मलिक त्याच्या दोन पत्नींनी शोमध्ये एन्ट्री घेताच त्याच्यावर चहूबाजूंनी टीका करण्यात आली. तो दोन लग्नांमुळे तुफान ट्रोल झाला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अरमानची पहिली पत्नी पायल घराबाहेर गेली. त्यानंतर सध्या अरमान आणि कृतिका हे दोघं घरामध्ये आहेत.

सध्या अरमान आणि कृतिकाचा इन्स्टाग्रामवर इंटिमेट व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी ‘बिग बॉस ओटीटी ३’ ची शुटिंग थांबवण्याची विनंती पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

सध्या सोशल मीडियावर अरमान आणि कृतिकाचा इन्स्टाग्रामवर इंटिमेट व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अरमानला तुफान ट्रोल केलं असून त्याला ‘बिग बॉस ओटीटी ३’मधून काढण्याचीही विनंती केली आहे. आता या वादामध्ये शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनीही उडी घेतली आहे. त्यांनी आज मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन बिग बॉसचं शुटिंग थांबवण्याची विनंती केली आहे. त्या शिवाय, तुम्ही जे करत आहात हे योग्य आहे का? असा सवाल ही त्यांनी निर्मात्यांना विचारला आहे.

"बिग बॉसमध्ये अश्लील चित्रीकरण दाखवले जात आहे. त्यांनी मर्यादा ओलांडल्या आहेत. लहान मुलंही बिग बॉस शो पाहतात. जे स्पर्धक करत आहेत, त्याचा परिणाम प्रेक्षकांच्या मनावर होत आहे. अरमान मलिक जे बोलत आहेत त्याचा परिणाजम लोकांच्या मनावर होतो. बिग बॉसच्या घरामध्ये, बलात्काराचं चित्रीकरण केलं जातं, तो स्वत:ला हिंदू म्हणवतो. तुम्ही जे करत आहात हे योग्य आहे का? या पद्धतीचे सीन्स दाखवणं योग्य नाही" अशी प्रतिक्रिया नेत्या मनीषा कायंदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना दिली आहे.

बिग बॉस ओटीटीची शुटिंग थांबवण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे केली आहे. शिवाय कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. त्यांची मागणी मान्य करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर अरमान आणि कृतिकाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून चाहते दोघांनाही ट्रोल करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : महाराष्ट्रात पुन्हा निवडणुकीचा धुरळा; ८ दिवसांत १७ जागांवर निवडणुका लागण्याची शक्यता

Diabetes Testing : ब्लड शुगर लेव्हल तपासण्याची योग्य वेळ कोणती? मिळेल अचूक रीडिंग

NEET 2026: मोठी बातमी! अखेर 'नीट' परीक्षा रद्द; पेपरफुटीची CBI चौकशी होणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Pahadi Mangalsutra Design: लग्नासाठी काहीतरी हटके हवंय? ट्राय करा पहाडी मंगळसूत्राचे हे 5 पॅटर्न, नवरीचा लूक दिसेल रॉयल

Maharashtra News Live Update: यवतमाळच्या अपार्टमेंटमधून मारूती स्विफ्ट गाडीची चोरी, चोरीची घटना CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT