Manisha Kayande Joins Shiv Sena: मनीषा कायंदे यांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटाला मोठा धक्का

मनीषा कायंदे यांचा शिवसेनेत प्रवेश, ठाकरे गटाला मोठा धक्का
Manisha Kayande Joins Shiv Sena
Manisha Kayande Joins Shiv SenaSaam Tv
Published On

Manisha Kayande Joins Shiv Sena: आमदार मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेनेत आज प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर कायंदे म्हणल्या आहेत की, मुख्यमंत्री यांनी अधिकृत शिवसेनेत प्रवेश दिला अभर मानले. या पुढे काम करत राहणार. २०१२ साली मी सेनेत आले. मी पक्षाची भूमिका भक्कम पणे मांडली.

Manisha Kayande Joins Shiv Sena
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: 'कोण होतास तू, काय झालास तू', फडणवीसांचा ठाकरेंना टोला

त्या म्हणाल्या की, ''सरकार एक वर्ष पूर्ण केलं आहे. शिंदे यांनी कामातून उत्तर दिलं आहे. राज्यात झपाट्याने काम केलं. समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिलं. आपल्याला थुकरटवाडी असणारे लोक नकोत. देवीचा अपमान करणारे लोक नकोत, असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या की, पक्ष प्रमुखांशी बोलताना अडचण येत असेल तर ती गद्दार वाटते. बाळासाहेबांची शिवसेना इथे आहे. म्हणून मी इथे आहे. (Latest Marathi News)

'फेसबुक लाईव्हमुळे माणसे वाचत नाही'

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ''कोविदमध्ये कामं करणारे कोण होते. आमच्यासारखे कार्यकर्ते लोकांना भेटत होते. असाध्य रोग होता. त्यांना वाचविण्याचे काम कोणी केलं, हे सर्वांना माहीत आहे. फेसबुक लाईव्हमुळे माणसे वाचत नाही.'' ते म्हणाले, अडीच वर्ष हे सर्व बंद होते. फडणवीस यांचा काळातील काम बंद केली. आम्ही काम सुरू केली आज ताईंनी प्रवेश घेतला. त्यांना शुभेछा दिल्या.

Manisha Kayande Joins Shiv Sena
Nagpur News: नागपूर शहरात खळबळ! खेळताना ३ मुलं बेपत्ता; आज कारमध्ये आढळले मृतदेह, नेमकं काय घडलं?

कोण आहेत मनिषा कायंदे?

प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. श्यामसुंदर कायंदे आणि सुशीला कायंदे यांच्या त्या कन्या आहेत. मनिषा कायंदे यांनी परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून काम पाहिलं आहे. 11 वर्ष मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समिती सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. कायंदे या स्त्रियांच्या प्रश्नांवर कायम आवाज उठवत असतात. महिलांना न्याय मिळावा म्हणून त्या अवनी या संस्थेमार्फत स्त्री शक्ती केंद्र चालवत आहेत.

लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या कायंदे यांनी भाजपमधून त्यांच्या राजकारणास सुरुवात केली. त्यांनी तब्बल 25 ते 30 वर्षे त्यांनी भाजपमध्ये काम केलं. 1997 मध्ये त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढवली. शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळाल्याने त्यांचा निसटता पराभव झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com