Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: 'कोण होतास तू, काय झालास तू', फडणवीसांचा ठाकरेंना टोला

'कोण होतास तू, काय झालास तू', फडणवीसांचा ठाकरेंना टोला
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
Devendra Fadnavis on Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: ''उद्धव ठाकरे आज काय काय बरळले, मला कधी कधी त्यांना म्हणावंसं वाटतं, कोण होतास तू, काय झालास तू'', असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

आज उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना लक्ष्य केलं. यालाच प्रत्युत्तर देताना अकोला येथे सभेत देवेंद्र फडणवीस असं म्हणाले आहेत.

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
Pune Crime: MPSC पास तरुणीचा सडलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह! पुण्यात खळबळ; ८ दिवसांपासून...

'मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊंगा'

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''2019 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत मी ठणकावून सांगितलं होतं की, मेरा पाणी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसना, मैं समंदर हूं लौटकर जरुर आऊं. मी परत तर आलोच शिंदेजींना देखील परत घेऊन आलो आहे.''

उद्धव ठाकरे अडीच वर्षात केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले

फडणवीस म्हणाले की, ''मागचं सरकार हे, हे घरी बसणारं सरकार होतं. हे मी म्हणत नाही. मी म्हटलं असत तर ते राजकीय झालं असतं.'' ते म्हणाले, शरद पवार यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्यात ते म्हटले आहे की, आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अडीच वर्षात केवळ दोन दिवस मंत्रालयात गेले. त्यामुळे आमचं नुकसान झालं.'' (Latest Marathi News)

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray
Manisha Kayande News: मोठी बातमी! ठाकरे गटाची मनिषा कायंदे यांच्यावर कारवाई; थेट पक्षाच्या प्रवक्तेपदावरून केली हकालपट्टी

'उद्धव ठाकरे यांची राजकीय समज थोडी कमी आहे'

शरद पवार यांच्या आत्मचरित्राबद्दल बोलत ते पुढे म्हणाले, पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे, उद्धव ठाकरे यांची राजकीय समज थोडी कमी आहे. म्हणून 40 लोक निघून गेले, तरी त्यांना समजलं नाही.

'कितीही वेली एकत्र आल्या तरी त्या वटवृक्ष होऊ शकत'

फडणवीस म्हणाले की, ''देशभरातील विरोधक पाटण्याला एकत्र येणार आहेत, हातात हात घेणार आहेत आणि 'मोदी हटाओ'च्या घोषणा देणार आहेत. आता त्यांच्यात एक नेता वाढला आहे. तो म्हणजे उद्धव ठाकरे. मात्र कितीही वेली एकत्र आल्या तरी त्या वटवृक्ष होऊ शकत नाही. वटवृक्ष एकच असतो त्याचं कुणीही वाकडं करु शकत नाही.''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com