Deven Bharti
Deven Bharti Saam Tv

Deven Bharati: डॅशिंग, धडाकेबाज, फडणवीसांचे खास; कोण आहेत मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती?

खास पदाची निर्मिती करुन नियुक्ती केल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकाही होताना दिसत आहे. पाहूया कोण आहेत, देवेन भारती..
Published on

Mumbai: मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलिस आयुक्तपदाची निर्मीती केली, ज्यानंतर देवेन भारती कोण? असा प्रश्न अनेकांना पडला. खास पदाची निर्मिती करुन नियुक्ती केल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकाही होताना दिसत आहे. पाहूया कोण आहेत, देवेन भारती. (Mumbai News)

Deven Bharti
Vishwas Patil: 'मालिकेत स्वराज्यरक्षक शब्द म्हणजे अमोल कोल्हेंची चलाखी', ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांची जोरदार टीका; फेसबूक पोस्ट व्हायरल

कोण आहेत देवेन भारती?

मुंबईचे नवे विशेष पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्विकारणारे देवेन भारती हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. डॅशिंग पोलिस अधिकारी अशी त्यांची विशेष ओळख आहे. 2015 मध्ये मुंबईच्या सहपोलीस आयुक्त पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या पदावर सर्वाधिक काळ सेवा बजावण्याची संधी देवेन भारती यांना मिळाली. या काळात देवेन भारती यांनी अनेक हाय प्रोफाईल प्रकरणांचा तपास केला.

26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांचा तपास, मिड डे या वृत्तपत्राचे पत्रकार जे.डे. यांच्या हत्येचा तपासही त्यांनी केला होता. राज्यात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला सळो की पळो करणारे अधिकारी म्हणून देवेन भारती ओळखले जातात. 26/11 प्रकरणातला दहशतवादी अजमल आमीर कसाबला फाशी देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा सहभाग होता.

Deven Bharti
Wardha News: दोनच शिक्षक शिकवितात सातवीपर्यंतचे वर्ग; विद्यार्थी, पालकांनी शाळेला ठोकले कुलूप

फडणवीसांचे 'खास' अशीही ओळख

देवेन भारती हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या खास मर्जीतले पोलिस अधिकारी म्हणूनही ओळखले जातात. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना त्यांनी पोलिस सहआयुक्तपदाचा कारभार पाहिला होता. महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांची बदल करण्यात आली होती. दरम्यान या नियुक्ती आधी काही दिवसांपूर्वीच देवेन भारती यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com