Kiran Mane And Uddhav Thackeray News Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kiran Mane Post : "२ मिस्ड कॉल, 'जय महाराष्ट्र'चा मेसेज अन् फोनवरून संवाद"; किरण माने-उद्धव ठाकरेंमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

Kiran Mane And Uddhav Thackeray News : लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला दमदार यश मिळाले आहे. दमदार यश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अभिनेते किरण माने यांचे फोन करून आभार मानले आहेत.

Chetan Bodke

लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. या निकालामध्ये इंडिया आघाडीने २३० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. तर एनडीएने एकूण २९४ जागांवर विजय मिळवला आहे. तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने दमदार यश मिळवलं आहे. तर राज्यात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे गटाची पहिलीच लोकसभा निवडणूक होती. या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला दमदार यश मिळालं आहे. मोठा यश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अभिनेते किरण माने यांचे फोन करून आभार मानले. दोघांमधील संवादानंतर अभिनेते आणि ठाकरे गटाचे नेते किरण मानेंनी पोस्ट केली.

अभिनेते किरण माने यांनी या पोस्टमध्ये ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नेमका काय संवाद झाला, हे सांगितले आहे. किरण माने यांनी पोस्टमध्ये सांगितले, "फोन सायलेंटवर होता. सहज हातात घेतला. बघतोय तर पंधरा मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरेंचे दोन मिस्ड कॉल्स येऊन पडले होते. नंतर 'जय महाराष्ट्र' असा मेसेज येऊन पडला होता. मी कॉलबॅक केला. उद्धव ठाकरेंनी उचलला. मी काही बोलायच्या आधी त्यांनी बोलायला सुरूवात केली..."

"किरणजी, महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा आहे. तुम्ही जे अफाट कष्ट घेतलेत, त्याबद्दल आभार. सोबत राहू कायम..." उद्धवजी बाळासाहेब ठाकरे माझ्याशी खूप काही बोलत होते.. माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू... शिवबंधनाचं सार्थक व्हायला सुरूवात झाली... भाग गेला सीन केला । अवघा झाला आनंद ।।" अशी पोस्ट किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेली आहे. किरण माने यांनी जानेवारी २०२४ मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाच्या प्रवक्त्या आणि नेत्या सुषमा अंधारे यांच्या उपस्थितीत किरण माने यांनी ठाकरे गटात प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

निलेश घायवळ प्रकरणात २ बड्या राजकीय नेत्यांची नावं, रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ | VIDEO

Politics : निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का? २ मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

Jalgaon Crime : कॉफी शॉपमध्ये पोलिसांची धाड; तरुण- तरुणी सापडले नको त्या अवस्थेत

SCROLL FOR NEXT