Shirdi Ke Sai Baba  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shirdi Ke Sai Baba : 'शिर्डी के साईबाबा' फेम अभिनेत्याची प्रकृती गंभीर; उपचारासाठी शिर्डीकरांकडून मदतीचा हात

Sudhir Dalvi Hospitalized : 'शिर्डी के साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवी रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्या उपचारासाठी शिर्डीकरांनी मदतीचा हात दिला आहे.

Shreya Maskar

'शिर्डी के साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सुधीर दळवी यांना शिर्डीकरांनी मदतीचा हात दिला आहे.

सुधीर दळवी यांना 'शिर्डी के साईबाबा' चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली.

सचिन बनसोडे, साम टीव्ही प्रतिनिधी

'शिर्डी के साई बाबा' या चित्रपटात साईबाबांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) यांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी शिर्डीकरांनी मदतीचा हात दिला आहे. शिर्डी ग्रामस्थांनी लाखो रुपयांची मदत केली आहे. 1977 साली प्रदर्शित झालेल्या 'शिर्डी के साईबाबा' चित्रपटामुळे साईबाबांची महती जगभरात पोहचली. मराठीसह हिंदी चित्रपटात विविध भूमिका साकारणारे अभिनेते सुधीर दळवी यांनी साकारलेली साई बाबांची भूमिका आजही खूप गाजत आहे. शिर्डीचे नाव जागतिक स्तरावर गेल्याने शिर्डीची मोठी भरभराट झाली.

सध्या अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी साधारण 15 लाख रुपये खर्च अपेक्षित असून दळवी कुटुंबियांनी चाहत्यांना मदतीसाठी आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत शिर्डीकर पुढे सरसावले आहेत. 2025च्या श्रीरामनवमी उत्सवात शिल्लक राहिलेल्या वर्गणीतील चार लाख आणि आणखी 1 लाख अशी पाच लाखांची मदत त्यांनी सुधीर दळवी यांना केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विखे परिवार देखील सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी दीड लाख रुपये मदत देणार आहे. अभिनेते सुधीर दळवी यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी शिर्डी ग्रामस्थांनी साई चरणी प्रार्थना केली आहे. दरम्यान अभिनेते सुधीर दळवी यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने देखील तात्काळ दखल घेतली आहे. मुख्यमंत्री मेडिकल रिलिफ फंडातून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

सुधीर दळवी 86 वर्षांचे आहेत. ते 8 ऑक्टोबरपासून मुंबईच्या लीलावती रुग्णालयात एडमिट आहेत. सुधीर दळवी यांनी सेप्सिससारखं जीवघेणं इन्फेक्शन (Sepsis Infection) झाले आहे. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी 'जुनून', 'चांदनी' , 'एक्सक्यूज मी' या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

रोमहर्षक अंतिम सामना! वर्षानुवर्षांच्या संघर्षानंतर दिल्लीचा ‘दबंग’ विजय; पुणेरी पलटनच्या संस्मरणीय हंगामाचा भावनिक शेवट

Powai Kidnapping Shock: पवईतील अपहरणाचा थरार, रोहितच्या एन्काऊंटरची इनसाईड स्टोरी

नेपाळ, बंगालनंतर आता 'या' देशातील सरकारविरोधात नागरिक उतरले रस्त्यावर; आंदोलनादरम्यान ७०० जणांचा मृत्यू

'सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा फसवलं,कर्जमाफी आश्वासनावर जरांगेंची टीका

SCROLL FOR NEXT