मुंबई: अश्लिल व्हिडिओ प्रकरणात राज कुंद्राच्या (Raj Kundra) अटकेमुळे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या शिल्पा शेट्टीच्या (Shilpa Shetty) आईची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. संबंधीत प्रकरणी शिल्पा शेट्टीची आई सुनंदा शेट्टि यांनी जुहू पोलीस स्थानकाच तक्रार नोंदवली आहे.
सुधाकर घारे यांच्या विरोधात ही तक्रार नोंदवण्यात आली असून ते मूळचे ता. कर्जत जिल्हा रायगडचे शेतकरी आहेत. सुनंदा यांनी मे 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान सुधाकर यांच्यासोबत कर्जत येथील एका जमिनीचा व्यवहार केला होता.
यावेळी जमीन ही स्वत:च्या नावावर असल्याचे सांगून सुधाकरने जमिन व बंगला खोटी कागदपञे बनवून सुनंदा यांना 1 कोटी 60 लाखांना विकला. कालांतराने संबंधीत बाब सुनंदा यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सुधाकरकडे पैशांसाठी तगादा लावला. सुधाकर हा एका राजकिय नेत्याचा जवळचा माणूस असल्याचे सांगितले जाते. माञ पैसे मिळणार नाही कोर्टात जा अशी धमकी सुधाकर देत असल्याचे सुनंदा यांनी तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी सुनंदा यांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जुहू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.