Shilpa Shetty Sukhee Poster Out Instagram
मनोरंजन बातम्या

Sukhee Poster: शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’च्या पोस्टरने वेधले लक्ष; 'या' दिवशी सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Sukhee Poster Released: शिल्पा शेट्टी ‘सुखी’ चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Shilpa Shetty Sukhee Poster Out

शिल्पा शेट्टी ‘सुखी’ चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. शिल्पा शेट्टी लवकरच ‘सुखी’ या कौटुंबिक चित्रपटातून एका मध्यमवर्गीय गृहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. घोषणा झाल्यापासून हा चित्रपट कायमच चर्चेत राहिला आहे. ‘सुखी’ चित्रपटाचे ‘शेरनी’,‘एयरलिफ्ट’ ‘छोरी’ आणि ‘जलसा’ सारख्या बहुचर्चित चित्रपटांचे निर्माते अबंडंटिया एंटरटेनमेंट आणि टी-सीरीजने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिल्यानंतर, T-Series आणि Abundantia Entertainment ने या विनोदी चित्रपटाची घोषणा केली आहे.

नुकतेच शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे पोस्टर शेअर करत प्रदर्शनाच्या तारखेचीही घोषणा केली आहे. चित्रपट येत्या २२ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सोनल जोशी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करणार आहे. (Bollywood Film)

‘सुखी’ची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विक्रम मल्होत्रा ​​आणि शिखा शर्मा यांनी केली आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टीसोबत कुशा कपिला, दिलनाज इराणी, पावलीन गुजराल, चैतन्य चौधरी आणि अमित साध महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाची कथा राधिका आनंदने लिहिली असून पटकथा पाउलोमी दत्ताने लिहिली आहे. (Actress)

‘सुखी’ची कथा गृहिणीभोवती फिरत आहे. सुखप्रीत कालरा उर्फ ‘सुखी’ ही ३८ वर्षीय पंजाबी गृहिणी दाखवण्यात आली आहे. जी 20 वर्षांनंतर त्यांच्या शाळेच्या रियुनियन कार्यक्रमासाठी दिल्लीला जाते. ‘सुखी’ ही प्रत्येक स्त्रीची गोष्ट आहे. बर्‍याच अनुभवांमधून जात असताना, ती पहिल्यांदाच स्वतःला आई आणि पत्नी म्हणून नाही तर एक स्त्री म्हणून पाहते. (Entertainment News)

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये शिल्पा शेट्टीचा साधा सिंपल लूक पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा हा लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसचे बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण काय?VIDEO

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Koli Community : कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा; महादेव, मल्हार कोळी समाज आक्रमक

SCROLL FOR NEXT