Haddi Trailer: धडाकेबाज ॲक्शन अन् ड्रामा... नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘हड्डी’ चा ‘भयानक’ ट्रेलर प्रदर्शित

Nawazuddin Siddiqui Haddi Trailer: नुकताच ‘हड्डी’ चा धडाकेबाज ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
Nawazuddin Siddiqui Haddi Trailer Out
Nawazuddin Siddiqui Haddi Trailer OutInstagram

Nawazuddin Siddiqui Haddi Trailer Out

खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिलेला नवाझुद्दिन सिद्दीकी सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या ‘टिकू वेड्स शेरू’नंतर नवाझुद्दिनचा आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या वर्षी ‘हड्डी’ मधील अभिनेत्याचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘हड्डी’चा फर्स्ट पोस्टर देखील प्रदर्शित झाला होता. अशातच ‘हड्डी’ चा आता धडाकेबाज ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच ट्रेलरला अवघ्या काही वेळातच लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Nawazuddin Siddiqui Haddi Trailer Out
Sunny Deol Gadar 2: ‘गदर २’ च्या यशानंतर ‘तारा सिंग’चं लंडनमध्ये धुमधडाक्यात स्वागत; व्हिडीओ आला समोर

अलीकडेच जियो सिनेमावर प्रदर्शित झालेली सुष्मिता सेनच्या ‘ताली’ वेबसीरिजची सर्वत्र चर्चा होत आहे. अशातच नवाझुद्दिन सिद्दिकीच्या ‘हड्डी’ ट्रेलरची सुद्धा जबरदस्त चर्चा होत आहे. पण ही कथा हक्कांसाठीच्या लढ्याची नाही तर सूडाची आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अक्षत शर्मा दिग्दर्शित ‘हड्डी’ च्या ट्रेलरची सुरुवात नवाजुद्दीन सिद्दीकीपासून होत आहे. या ट्रेलरच्या सुरुवातीला नवाजुद्दीन एका ट्रान्सजेंडरच्या लूकमध्ये दिसून येत आहे. नवाजुद्दीननं हड्डी या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शन दिलंय की, ‘सूड कधी इतका थंड दिसला आहे का? ‘हड्डी’ येत आहे, सूडाची कथा तुमच्या समोर मांडण्यासाठी’

नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनित ‘हड्डी’चा ट्रेलरपाहून आपल्याला या चित्रपटाची कथा बदला घेण्यावर दिसत आहे. ‘हड्डी’ या चित्रपटात ॲक्शन आणि ड्रामा पहायला मिळणार आहे. मारामारी, राडा आणि रक्तपात दिसून येत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीचे पात्र या चित्रपटामध्ये फार वेगळ्याच धाटणीचे असून त्याचा लूक आणि अभिनय कमालीचा चर्चेत आला आहे. ट्रेलरमध्ये नवाझुद्दिन सिद्दीकीचे पात्र तर लक्षवेधी आहेच पण सोबतच, अनुराग कश्यप आणि झीशान अय्युबचे देखील पात्र लक्षवेधी दिसत आहेत. ट्रेलरमध्ये दोघांची व्यक्तिरेखा खूपच दमदार दिसत आहे.

Nawazuddin Siddiqui Haddi Trailer Out
Gadar 2 Movie Box Collection: आता ‘गदर २’ रजनीकांतच्या ‘जेलर’वरही पडणार भारी!, कमाईचा आलेख चढताच

मुख्य बाब म्हणजे, नवाजुद्दीन सिद्दीकी या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अक्षत अजय शर्मा यांनी केले असून हा चित्रपट थिएटरमध्ये नाही तर OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार आहे. ट्रेलरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अनुराग कश्यप सोबतच चित्रपटामध्ये इला अरुण, मोहम्मद जीशान अय्यूब, सौरभ सचदेवा, श्रीधर दुबे, राजेश कुमार, विपिन शर्मा और सहर्ष शुक्ला या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. ‘हड्डी’ ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर नेटकऱ्यांमध्ये या चित्रपटाविषयी चांगलीच क्रेझ निर्माण झाली आहे. आता या चित्रपटाला प्रेक्षकांची कशाप्रकारे पोचपावती मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com