Shilpa Shetty SAAM TV
मनोरंजन बातम्या

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचं 'बॅस्टियन' रेस्टॉरंट बंद होणार, भावुक पोस्ट शेअर

Shilpa Shetty Restaurant Bastian Bandra Closing : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे 'बॅस्टियन' रेस्टॉरंट बंद होणार आहे. यासंदर्भात अभिनेत्रीने भावुक पोस्ट केली आहे.

Shreya Maskar

शिल्पा शेट्टीचे 'बॅस्टियन' रेस्टॉरंट बंद होणार आहे.

'बॅस्टियन' रेस्टॉरंट मुंबईत वांद्रे येथे आहे.

शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर भावुक पोस्ट केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिल्पा शेट्टीने पोस्ट करून 'बास्टियन वांद्रे' (Bastian Bandra) बंद होणार असल्याची घोषणा केली आहे. नेमकं पोस्टमध्ये काय म्हटले, जाणून घेऊयात.

शिल्पा शेट्टी पोस्ट

"या गुरुवारी मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक 'बास्टियन'ला निरोप देत आहोत. ज्या ठिकाणी असंख्य आठवणी, अविस्मरणीय रात्री आणि शहराच्या नाइट लाइफचे खास क्षण घालवे. या सुंदर जागेचा सन्मान करण्यासाठी आम्ही आमच्या जवळच्या ग्राहकांसाठी खास संध्याकाळी एक कार्यक्रम आयोजित करत आहोत. ही रात्र जुन्या आठवणी आणि जादूने भरलेली असेल. 'बास्टियन'चा शेवटचा दिवस साजरा करेल. पुढच्या आठवड्यापासून ही परंपरा 'बास्टियन ॲट द टॉप'मध्ये पुढे चालू राहणार आहे."

शिल्पा शेट्टीचे 'बास्टियन' हे रेस्टॉरंट 2016 मध्ये सुरू झालं होते. त्यानंतर 2023ला ते मुंबईत वांद्रे येथे शिफ्ट झाले. 'बास्टियन' रेस्टॉरंट हे खवय्यांसाठी बेस्ट लोकेशन होते. 'बास्टियन' रेस्टॉरंट हे त्याच्या आकर्षक इंटिरियरसाठी ओळखले जायचे. शिल्पा शेट्टीने अद्याप रेस्टॉरंट बंद करण्याचे कारण स्पष्ट केले नाही. 'बास्टियन' हे शिल्पा शेट्टी आणि रेस्टॉरंटचे मालक रणजीत बिंद्रा यांच्या संयुक्त मालकीचे आहे. 'बास्टियन' सीफूडसाठी प्रसिद्ध आहे.

Shilpa Shetty Kundra

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांच्यावर फसवणुकीचा आरोप

गेले अनेक दिवसांपासून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यावर 60 कोटी रुपयांच्या फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2015- 2023 या काळात इन्व्हेस्टमेंट डील आणि कर्ज-सह-गुंतवणूकीच्या नावाखाली त्यांनी गैरव्यवहार केल्याचे म्हटले आहे. मात्र शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT