Manasvi Choudhary
उद्या लाडक्या बाप्पाचे भक्ताच्या घरी आगमन होणार आहे.
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी देखील बाप्पा विराजमान होतात.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी दरवर्षी गणेशोत्सवाचा जल्लोष असतो.
मात्र यावर्षी अभिनेत्री शिल्पा शेट्टी गणपती बसवणार नाही.
शिल्पाच्या कुटुंबातील व्यक्तीचं निधन झाल्यानं यंदा शिल्पा शेट्टी गणेशोत्सव साजरा करता येणार नाही.
कुटुंबातील दुखवट्यामुळे परंपरेनुसार आम्ही १३ दिवसाचं सुतक पाळत आहोत असं तिने सोशल मिडिया माध्यमाद्वारे सांगितलं आहे.