मुंबई: सोनाक्षी सिन्हा, हुमा कुरेशी (Bollywood Actress) मुख्य भूमिकेत असलेल्या 'डबल एक्स एल' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे (Bollywood Movie) . कालच चित्रपटातील एक फोटो शेअर करण्यात आला असून त्यात (Cricket) क्रिकेटर शिखर धवनही (Shikhar Dhawan) असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शिखर बॉलिवूड क्षेत्रात पदार्पण करणार आहे. चित्रपटातील त्याची भूमिका काय असणार हे सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. चित्रपटाचा आज सोशल मीडियावर ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
शेअर केलेल्या ट्रेलरमध्ये, सोनाक्षी आणि हुमाच्या वाढलेल्या वजनामुळे आयुष्यात काय काय अडचणी येतात हे ट्रेलर पाहिल्यावरच कळेल. ट्रेलरच्या सुरुवातीलाच एका पार्टीत शिखर डान्स करताना दिसत आहे. हुमाची चित्रपटात राजश्री त्रिवेदीची भूमिका असून सोनाक्षीने सायरा खन्नाचे पात्र साकारले आहे. राजश्री आणि सायरा या दोघींच्या आयुष्यावर आधारित ट्रेलर दाखवण्यात आला आहे. आपल्या वजनामुळे सायराला तिचा बॉयफ्रेंड धोका देतो. या सर्व कठीण प्रसंगी सायरा आणि राजश्रीची घट्ट मैत्री होते आणि त्या दोघेही आपल्या वजनावर चर्चा करतात.
बॉलीवूडमध्येच नाही तर जवळपास सर्वच क्षेत्रात बॉडी शेमिंग नावाचा प्रकार आहे. बॉडी शेमिंगला बऱ्याच अभिनेत्री सामोऱ्या गेल्या आहेत. बॉडी शेमिंगवरुन काही अभिनेत्रींच्या आयुष्यावर झालेल्या परिणामाविषयी त्यांनी मुलाखतीत सांगितले आहे. या विषयावर भाष्य करणारा 'डबल एक्स एल' चित्रपट आहे. टीझरला मिळालेल्या प्रतिसादावरून आता ट्रेलरही नेटकऱ्यांचा कुतूहलाचा विषय ठरत असून त्याला चाहत्यांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
चित्रपटात आकर्षणचा बिंदू शिखर धवन असून त्याच्या पदार्पणामुळे क्रिकेट जगतासह मनोरंजनक्षेत्रात चांगलीच चर्चा रंगत आहे. चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांच्यासोबतच जहीर इकबाल आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महत राघवेंद्र हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. महत राघवेंद्र या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
सतराम रमणी दिग्दर्शित भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, राजेश बहल, आश्विन वर्दे, साकिब सलीम, हुमा कुरेशी आणि मुदस्सर अजीज यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.