Sherlyn Chopra Saam tv
मनोरंजन बातम्या

Sherlyn Chopra: प्रसिद्ध अभिनेत्रीने सर्जरीनंतर दाखवला सिलिकॉन आणि नॅचरल ब्रेस्ट मधला फरक, VIDEO व्हायरल

Sherlyn Chopra: अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली आहे. तिचे सिलिकॉन ब्रेस्ट काढले गेले आहेत, ज्याचे वजन ८२५ ग्रॅम आहे. शर्लिनने हे ब्रेस्ट काढल्यानंतर तिला कसे वाटले ते सांगितले.

Shruti Vilas Kadam

Sherlyn Chopra: अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्राने तिच्या आरोग्याबद्दल एका मोठ्या खुलासा केला आहे. तिने सांगितले की, अनेक महिन्यांच्या शारीरिक त्रासानंतर तिने तिचे ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकण्याचा निर्णय घेतला. इंस्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्ससोबत अपडेट शेअर करताना, शर्लिन चोप्राने स्पष्ट केले की ही शस्त्रक्रिया सततच्या वेदनांमुळे झाली होती ज्याचा तिच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागला होता.

शर्लिन चोप्राने तिचे सिलिकॉन ब्रेस्ट देखील दाखवले, जे तिने पूर्वी इम्प्लांट केले होते आणि आता शस्त्रक्रियेनंतर काढले आहेत. त्यांचा फोटो दाखवत तिने लिहिले, "सिलिकॉन फ्री!!! बरे होण्याच्या मार्गावर... माझे ब्रेस्ट इम्प्लांट, जे ८२५ ग्रॅम वजनाचे होते, काढून टाकल्यानंतर खूप हलके वाटत आहे!"

शर्लिन चोप्राने ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केली

याव्यतिरिक्त, शर्लिनने एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये ती तिच्या हातात सिलिकॉन ब्रेस्ट धरताना दिसत आहे आणि लोकांना तिने केलेली चूक पुन्हा करू नये असा इशारा दिला आहे. शर्लिनने लिहिले आहे, "मला ठामपणे वाटते की अनावश्यक ओझे घेऊन जीवन जगण्यात काही अर्थ नाही! हे माझे वैयक्तिक मत आहे. माझ्या ब्रेस्ट इम्प्लांट काढण्यासाठी/ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीसाठी माझ्या अत्यंत कुशल डॉक्टरांच्या टीमचे खूप खूप आभार."

मागील व्हिडिओमध्ये तिने स्पष्ट केले होते की, "गेल्या काही महिन्यांपासून, मला माझ्या पाठ, छाती, मान आणि खांद्यात सतत वेदना होत आहेत आणि माझ्या छातीभोवती सतत दबाव येत आहे. अनेक डॉक्टरांशी बोलल्यानंतर मला अखेर माझ्या लक्षणांचे कारण समजले."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात पहाटे भीषण अपघात

Shocking : धक्कादायक! 45 प्रवाशांनी भरलेली खासगी बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी, नागपुरात खळबळ

Jaggery vs Sugar: साखरेऐवजी गूळ खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे का? तज्ज्ञांनी सांगितले फायदे

Jowar vs Bajra Bhakri: ज्वारी की बाजरी, वजन कमी करण्यासाठी कोणती भाकरी योग्य?

Rava Barfi Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा झटपट हॉटेल स्टाईल टेस्टी रवा बर्फी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT