Sherlyn Chopra Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sherlyn Chopra News: धक्कादायक! अभिनेत्री शर्लिन चोप्राचा गंभीर आरोप; फायनान्सर विरोधात विनयभंगाचा गुन्हा

Sherlyn Chopra's Complaint Against Financer: अभिनेत्री शर्लिन चोप्राला जीवे मारण्याची धमकी.

सूरज सावंत

Sherlyn Chopra FIR: अभिनेत्री शर्लिन चोप्राने एका फायनान्सर विरोधात जुहू पोलिस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे. या फायनान्सरने एका व्हिडिओ रेकाॅर्डिंगसाठी पैसे देण्याच्या सांगून जवळीकता साधत चुकीचा स्पर्श केला, असे आरोप शर्लिन चोप्राने तक्रारीत केले आहेत. तसेच तिला या फायन्सार जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे.

शर्लिनने विरोध केला असता फायनान्सरने शर्लिनला अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. फायनान्सर एवढ्यावरच थांबला नाही. त्याला राग अनावर झाल्याने त्याने शर्लिनला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली.

या प्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी सुनिल लोढा विरोधात जुहू पोलिस ठाण्यात कलम ३५४, ५०६,५०९ भादवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शर्लिनने ऑक्टोबर 2021 मध्ये राज कुंद्रा आणि त्याची पत्नी शिल्पा शेट्टीविरोधात तक्रार दाखल केली होती. दोघांवर मानसिक छळाचे आरोप तिने केला होता. राज कुंद्राला पॉर्नोग्राफिक व्हिडिओ तयार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आले होते. त्यानंतर राज आणि शिल्पाने शर्लिनवर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. शर्लिने जाहीर माफी मागावी अशीही मागणी केली आहे.

शर्लिनने साजिद खान विरोधात देखील तक्रार दाखल केली होती. तसेच तो 'बिग बॉस'च्या घरामध्ये असताना त्याला घरातून बाहेर काढावे अशी मागणी देखील केली होती. साजिद खनिज हेव्ह 'बिग बॉस'च्या घरामध्ये होता तेव्हा त्याच्यावर अनेक मुलींनी त्याच्या विरोधात #metoo अंतर्गत लैंगिक छळाचे आरोप केले होते. त्यामुळे शर्लिनने साजिद 'बिग बॉस'च्या घरामध्ये राहण्याच्या लायकीचा नाही म्हणत त्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली होती.

राखी सावंतवर शर्लिन चोप्राचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो इंटरनेटवर व्हायरल केल्याचा आरोप आहे. मॉडेलच्या तक्रारीनंतर राखी सावंत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शर्लिन चोप्रासोबत सुरू असलेल्या वादामुळे राखी सावंतला आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले होते. शर्लिन चोप्राने गेल्या वर्षी 9 नोव्हेंबर 2022 रोजी राखी सावंत विरोधात तक्रार दाखल केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola : ऑपरेशन थिएटरमध्ये मांसाचे गोळे; आरोग्य केंद्रात अवैध गर्भपात, अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Mumbai Car Boat: मुंबईच्या समुद्रात चक्क धावतेय Rolls Royce, व्हिडिओ झाला व्हायरल, वाचा

Nagpur: लग्नावरून परतताना काळाचा घाला, भरधाव ट्रकने तिघांना चिरडलं; सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू

Zodiac signs: आजचा दिवस शुभ की आव्हानात्मक? या ४ राशींना मिळणार अनपेक्षित लाभ

Maharashtra Live News Update : रोहित पवारांना नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT