Shehnaaz Gill  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shehnaaz Gill Share Video : मी कोणाचं हृदय तोडलं नाही... शहनाजने लाईव शोदरम्यान बोलून दाखवली मनातील खदखद

Shehnaaz Gill Video: शहनाजने तिच्या दुबईतील शोचा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे.

Saam Tv

Shehnaaz Gill Share Her Dubai Show Video : 'बिग बॉस १३' पर्व गाजवणारी शहनाज नेहमी चर्चेत असते. शहनाज ही पंजाबी गायिकाही आहे. शहनाज गिल नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही न काही करत असते. शहनाजने स्वत:चा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शहनाजने तिच्या दुबईतील शोचा व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर केला आहे. शहनाज या व्हिडिओमध्ये चाहत्यांसाठी गाणी गाताना दिसत आहे.

शहनाजच्या या शोला प्रेक्षकांनी चांगलीच गर्दी केली होती. शहनाज सिल्व्हर रंगाच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. शहनाज भर शोमध्ये स्टेजवर बसली आणि चाहत्यांशी संवाद साधू लागली. तिचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (Latest Entertainment News)

शहनाज चक्क स्टेजवरच बसली

या व्हिडिओत शहनाज स्टेजवर बसली आहे. ती चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. चाहत्यांनी तिला फोटोसाठी विचारल्यावर ती म्हणाली, 'मी सर्वांना फोटो देणार. सर्वांना भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही.

तुम्ही एवढ्या प्रेमाने माझ्यासाठी आला आहेत. तुम्हाला न भेटता कशी जाईन मी? फक्त भेटताना धक्काबुक्की होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही एवढ्या महागाची तिकीटे काढून आला आहात. तुम्हाला भेटणं माझा हक्क आहे.'

त्यानंतर शहनाज पुन्हा गाणं गायला सुरवात करते. शहनाजने तिच्याच 'मून राईस' गाण्याने सर्वांनाच भूरळ पाडताना दिसत आहे. शहनाज गाणं गात असताना मनातील एक गोष्ट बोलून दाखवते. ती म्हणते की,'मी कोणाचे हृदय तोडत नाही पण माझंच हृदय तुटलं आहे'.

शहनाज गात असलेल्या गाण्याचा अर्थही असाच काहीसा होता. शहनाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहनाजने व्हिडिओखाली 'प्रिय प्रेक्षक हो,तुमच्या सर्वांचे इथे येण्यासाठी आभार. मी खूप लक्की आहे की तुमच्यासारखे प्रेक्षक मला लाभले. शो हाउसफुल. लव यू दुबई' असं म्हणत प्रेक्षकांना धन्यवाद म्हटले आहे.

'बिग बॉस'चं पर्व गाजवणारी शहनाज नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन करत असते. शहनाज नुकतीच सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' चित्रपटात झळकली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Makar Sankranti 2026: मकरसंक्रातीला खिचडी दान केल्याने काय होतं?

Goa Tourism : फुल टू धमाल! 'गोव्यातील' Hidden पिकनिक स्पॉट, वीकेंड होईल खास

Maharashtra Live News Update : बुलढाण्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार डिव्हायडरवर आदळली

मुलाच्या अंगात राक्षस शिरला, आई अन् बायकोला दगडानं ठेचलं, मांस खाल्ला; हैवानी कृत्य बघून अख्खं गाव हादरलं

महापालिका निवडणुकीत पैशांचा पाऊस, अपक्ष उमेदवाराने पकडली २० लाखांची रोकड, राजकारण खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT