Adipurush Box Office Collection: हिंदी प्रेक्षकांची चित्रपटाकडे पाठ; ३०० कोटींचा गल्ला जमवलेला आदिपुरूष हिट की फ्लॉप?

Adipurush 6th Day Box Office Collection: सहा दिवसात चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बरेच परिणाम झाले आहेत.
Adipurush Box Office Collection
Adipurush Box Office CollectionSaam Tv
Published On

Adipurush Hit Or Flop: आदिपुरुष चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देखील त्याचे वाद सुरूचा आहेत. चित्रपट प्रदर्शित सहा दिवस झाले आहेत. या सहा दिवसात चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर बरेच परिणाम झाले आहेत.

काल आदिपुरुष(Adipurush) चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये ३० % घट झाली आहे. आदिपुरुष चित्रपटाचे बुधवारी संपूर्ण भारतात ९ कोटींचे कलेक्शन केले आहे. तर चित्रपटाने शाह दिवसात २६२.५० कोटींचे कलेक्शन केले आहे. आदिपुरुष चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा गल्ला काल पार केला आहे. ३०७. ५० कोटीची कमाई आदिपुरुष चित्रपटाने जगभरात केली आहे.

Adipurush Box Office Collection
Jugal Hansraj On Bollywood: रोमँटिक काळातला चॉकलेटी हिरो, तरुणींचा जीव की प्राण; अचानक बॉलिवूड का सोडलं?

आदिपुरुष चित्रपटाने पहिल्या बुधवारी ४.५० कोटींची कमाई तेलगूमध्ये तर ३.८० कोटींची कमाई हिंदीमध्ये केली आहे. चित्रपटाने वीकेंडला चांगले कलेक्शन केले होते. तर तेलगू व्हर्जनमधील चित्रपट वीक डेजमध्ये चांगली कामगिरी करत आहे. (Box Office Collection)

भारतीय बॉक्स ऑफिसवर आदिपुरुषचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

शुक्रवार: रु. 86 कोटी

शनिवार: रु. 66.50 कोटी

रविवार: रु. 68 कोटी

सोमवार: रु. 19.50 कोटी

मंगळवार: रु. 13.50 कोटी

बुधवार: रु. 9 कोटी

एकूण: रु. 262.50 कोटी

Adipurush Box Office Collection
HBD Amrish Puri: नायक नहीं खलनायक हूं मैं... हिरो बनण्याचे स्वप्न घेऊन आलेले अमरीश पुरी कसे झाले खलनायक, जाणून घ्या रंजक किस्सा

चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुमारे 500 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. चित्रपटाचे अनेक राईट्स विकून चित्रपटाने प्रदर्शनाधीच बरीच कमाई केली आहे. या चित्रपटाचे म्युजिकल राईट्स, चित्रपटाचे डिजिटल राईट्स, चित्रपटातील गाण्यांचे राईट्स इत्यादींचा समावेश आहे.

भारतीय बॉक्स ऑफिसवर आदिपुरुषचे प्रादेशिक ब्रेकडाउन

आंध्रप्रदेश : रु. 105.70 कोटी (रु. 64.50 कोटी शेअर)

कर्नाटक: रु. 17.50 कोटी (रु. 8.50 कोटी शेअर)

तामिळनाडू/केरळ: रु. 7.80 कोटी (रु. 3.25 कोटी शेअर)

उर्वरित भारत: रु. 131.50 कोटी (रु. 57.25 कोटी शेअर)

एकूण: रु. 262.50 कोटी (रु. 133.50 कोटी शेअर)

आदिपुरुष चित्रपटातील वादग्रस्त डायलॉगमध्ये बदल करून चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाची क्रेज कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com