Shefali Jariwala Saam tv
मनोरंजन बातम्या

Shefali Jariwala: IT इंजीनियर होती शेफाली जरीवाला; अभिनेत्रीबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

Shefali Jariwala: कांटा लगा गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला आता या जगात नाही. २७ जूनच्या रात्री तिचे निधन झाले आणि काल तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

Shruti Vilas Kadam

Shefali Jariwala: २७ जूनच्या रात्री ४२ वर्षांच्या कांटा लगा गर्ल उर्फ ​​शेफाली जरीवालाचे निधन झाले. अभिनेत्रीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. कूपर हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनानंतर, शेफालीला काल पती पराग त्यागी, कुटुंब आणि जवळच्या मित्रांनी सहअश्रू निरोप दिला.

शेफाली जरीवाला एक इंजिनिअर होती

शेफाली जरीवाला गेल्या दोन दशकांपासून इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी बॉलिवूड, साऊथ सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. १५ डिसेंबर १९८२ रोजी अहमदाबाद येथे जन्मलेली शेफाली ग्लॅमर जगात येण्यापूर्वी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. तिने सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून माहिती तंत्रज्ञान (आयटी) मध्ये अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेतले.

शेफाली जरीवाला ही 'कांटा लगा' या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओसाठी फेमस आहे. या गाण्याने तिला रातोरात स्टार बनवले. पण तुम्हाला माहिती आहे का की या म्युझिक व्हिडिओसाठी अभिनेत्रीला खूप संघर्ष करावा लागला. खरंतर, ती कॉलेजमध्ये असताना तिला 'कांटा लगा' या गाण्याची ऑफर मिळाली होती. तिचे वडील त्याला कडाडून विरोध करत होते. तथापि, अखेर अभिनेत्रीने खूप मेहनत घेत त्यांना तयार केले. एका मुलाखतीत शेफालीने सांगितले होते की २००२ मध्ये रिलीज झालेल्या 'कांटा लगा' या गाण्यासाठी तिला फक्त ७ हजार रुपये फी मिळाली.

शेफाली जरीवाला एक व्यावसायिका होती

टीव्ही शो, कार्यक्रम आणि जाहिराती करण्याव्यतिरिक्त, शेफाली जरीवाला तिच्या बहिणीसोबत व्यवसायही करायची. २०१६ मध्ये, तिने तिच्या बहिणीसोबत 'WYN' ही व्यावसायिक प्रशिक्षण कंपनीची सुरू केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nachni ladoo Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी घरच्या घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे लाडू

Maharashtra Live News Update: रत्नागिरीच्या लोटे midc मध्ये विनती ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट, एकाचा मृत्यू

कोण संजय राऊत? मी नाही ओळखत; आरोपांवर भडकले श्रीकांत शिंदे | VIDEO

Mumbai Pune Expressway वर अपघाताचा थरार! कंटेनरचा ब्रेक फेल झाला अन् ७-८ वाहने एकमेकांना धडकली, अपघातात महिलेचा मृत्यू

Saam Impact: हॉटेलवरील गुजराती पाट्या काढून लावल्या मराठी पाट्या; साम टीव्हीच्या दणक्यानंतर आली जाग|VIDEO

SCROLL FOR NEXT