Shefali Jariwala Mother: अभिनेत्री आणि 'कांटा लगा' फेम शेफाली जरीवालाच्या अचानक निधनामुळे संपूर्ण मनोरंजन सृष्टी हादरली आहे. २७ जून रोजी कार्डिएक अॅरेस्टमुळे तिचं निधन झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर तिच्या आईचा भावनिक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शेफालीच्या निधनानंतर तिची आई सुनीता जरीवाला रुग्णालयात पोहोचली, तेव्हा त्या खूप रडत होत्या. गाडीतून उतरताच त्या धाय मोकलून रडताना दिसल्या. उपस्थित नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, पण दुःख अतोनात होतं. हा हृदयद्रावक प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांत अश्रू आले.
शेफालीच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टेमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. तिचा पती पराग त्यागी आणि कुटुंबीय सध्या अत्यंत दुःखात आहेत. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी शेफालीच्या जाण्यावर दुःख व्यक्त केलं आहे. चाहत्यांनी तिच्या जुन्या पोस्ट्सवर श्रद्धांजली वाहिली आहे.
शेफाली जरीवाला ही ‘बिग बॉस १३’ आणि ‘नच बलिये’मुळे प्रसिद्ध होती. तिचं अचानक जाणं हे सर्वांनाच धक्का देणारं ठरलं आहे. तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तिच्या आईचा हृदयद्रावक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.