Shefali Jariwala Death Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shefali Jariwala Death: शेफालीच्या निधनानंतर पतीचे रडून रडून बेहाल; हॉस्पिटलबाहेरचा पहिला VIDEO समोर

Shefali Jariwala Husband Parag Tyagi First Video: अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या ४२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शेफालीचा पती पराग त्यागीचा तिच्या निधानानंतरचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

Siddhi Hande

काँटा लगा फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला (Shefali Jariwala) हिचे दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्यामुळे तिचे निधन झाले. शेफालीने वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. शेफालीला मुंबईतील तिच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर तिचा पती पराग त्यागी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. परंतु तिचे दुःखद निधन झाले. शेफालीच्या निधनानंतर पती पराग त्यागीला (Parag Tyagi) खूप दुःख झाले आहे. शेफालीच्या मृत्यूनंतर तिच्या पतीचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

शेफालीच्या निधानानंतरचा पती परागचा व्हिडिओ (Shefali Jariwala Husband Parag Tyagi First Video After her Death)

काल रात्री शेफालीचे निधन झाले. शेफालीने पराग त्यागीने हॉस्पिटलमध्ये नेले. त्यानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये पराग खूप रडताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील बेलव्यू हॉस्पिटलमध्ये शेफालीला उपचारासाठी आणले होते. परंतु त्याआधीच तिचे निधन झाले असल्याचे सांगितले जात आहे. हॉस्पिटलमधून बाहेर पडतानाचा पराग त्यागीचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये काय आहे? (Shefali Jariwala Husband Video)

पराग आपल्या गाडीतून हॉस्पिटलच्या गेटबाहेर जाताना दिसत आहे. यावेळी परागने आपल्या चेहऱ्यावर हात ठेवला आहे. पराग खुप दुःखी असल्याचे दिसत आहे. पत्नी शेफालीच्या अचानक निधनाने त्याला शॉक बसला आहे. यानंतर मुंबई पोलिस, फॉरेंसिक टीम शेफालीच्या घरी दाखल झाल्याचाही व्हिडिओ समोर आला आहे.

शेफालीच्या आईचाही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तिची आईदेखील लेकीच्या जाण्याने खूप दुःखी असल्याचे दिसत आहे. तिचे डोळे अश्रूंनी भरलेले आहेत.

शेफाली जरीवालाने अनेक चित्रपटात आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. तिला कांटा लगा या गाण्याने प्रचंड लोकप्रियता दिला. त्यानंतर तिला कांटा लगा गर्ल म्हणून ओळखले जायचे. तिने नच बलिये ५ आणि बिग बॉसमध्ये भाग घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Gas Cylinder: फक्त ३०० रूपयांत गॅस सिलिंडर, राज्य सरकारची मोठी घोषणा, लाखो लोकांना होणार फायदा

'अहो आज रात्री तरी..' नवरा दूर-दूर, बायकोकडून शरीरसंबाधासाठी पुढाकार, पतीनं गुप्तांगाला चटके देत केला छळ

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत अचानक घसरण, इतकं झालं स्वस्त, वाचा २४ आणि २२ कॅरेटचे आजचे दर

Tejaswini Lonari : "हलद लाविते गं..."; सरवणकरांची होणारी सून हळदीत रंगली, पाहा खास PHOTOS

Putin India Visit: ४ वर्षांनंतर व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर, ३० तासांचा मेगाप्लान; १० लाख नोकऱ्या आणि अणुकराराची शक्यता

SCROLL FOR NEXT