Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खान हल्ल्यानंतर अजूनही रुग्णालयात दाखल आहे आणि त्याची प्रकृती सुधारत आहे. मुंबई पोलिसांच्या अनेक पथकांनी मिळून सैफच्या हल्लेखोराला ठाण्यातूनअटक केले. पोलिसांना संशय आहे की आरोपी बांगलादेशी आहे आणि तो विजय दास या नावाने मुंबईत राहत होता. या सगळ्यामध्ये, ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी सैफ अली खानवरील चाकू हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी सैफ आणि करीनाचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये सैफ हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला आहे आणि करीना त्याच्या शेजारी बसली आहे आणि दोघेही हसतमुखाने पोज देत आहेत.
दरम्यान, हे फोटो एआय जनरेट केलेले दिसत आहे. हा फोटो शेअर करताना शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर लिहिले की, "आपल्या जवळच्या आणि लाडक्या सैफ अली खानवर झालेला हल्ला खूप दुःखद आणि दुर्दैवी आहे, ज्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. 'देवाची कृपा की तो बरा होत आहे. सुरु असलेला रोपाचा खेळ थांबवा कारण पोलिस त्यांचे काम उत्तम प्रकारे करत आहेत."
शत्रुघ्न सिन्हा पुढे लिहितात, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या काळजी आणि उपाययोजनांचे आम्ही निश्चितच कौतुक करतो. कोणीही हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचे करण्याचा प्रयत्न करू नका. हे प्रकरण लवकरच सोडवले जाईल असा माझा विश्वास आहे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी केली सैफसाठी प्रार्थना
शत्रुघ्न सिन्हा यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमचे मित्र एकनाथ शिंदे यांचे त्यांच्या काळजीबद्दल आणि प्रयत्नांबद्दल धन्यवाद. शेवटी, सैफ हा सर्वोत्तम स्टार्सपैकी एक आहे आणि तो पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता देखील आहे. कायदा आपले काम करेल. मी सैफला लवकर बरे वाटु दे अशी प्रार्थना करतो. परंतु, ही पोस्ट केल्याच्या काही काळानंतर हा फोटो एआय असल्यामुळे त्यांना या पोस्टमधील फोटो काढून टाकावा लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.