Marvel Wastelanders Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marvel Wastelanders: मराठमोळ्या अभिनेत्याची हॉलिवूडमध्ये जादू, मार्वेल कॉमिकच्या 'या' भूमिकेसाठी देणार आवाज

मार्वेल वेस्टलँडर्स या हॉलिवूड ऑडीबल सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेत्यांसह एक मराठमोळा अभिनेतादेखील आपला आवाज देणार आहे.

Chetan Bodke

Marvel Wastelanders In Sharad Kelkar: अनेकदा मराठी चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लिलया पार पाडणारा, नेहमीच आपल्या भारदस्त आवाजाने चर्चेत असणारा अभिनेता शरद केळकर याची अशी ओळख सर्वश्रुत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत नेहमीच त्याला प्रेक्षक आवर्जून पसंदी दर्शवतात. त्याच्या आवाजाची जादू आता शरद केळकर लवकरच हॉलिवूडमध्ये ही दाखवणार आहे.

आपल्या भारदस्त आवाजाने नेहमीच शरद मराठी चित्रपटसृष्टीत ओळखला जातो. पण सोबतच शरद केळकरच्या आवाजाची जादू आपण सर्वांनीच दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही पाहिली होती. पण आता लवकरच तो हॉलिवूड चित्रपटातही आवाज देणार आहे. मार्वेलच्या ‘गार्डीयन्स ऑफ गॅलक्सि’ आणि ‘मॅडमॅक्स फ्यूरी’सारख्या हॉलिवूडपटांच्या हिंदी डबिंगमध्येही शरद केळकर सहभागी होता.

आता पुन्हा एका मोठ्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये शरद केळकरची निवड करण्यात आली आहे. मार्वेलच्या ऑडीबल सीरिजमधील ‘wolverine’ या सुपरहिरोला आता शरद केळकर स्वतःचा आवाज देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकतंच या सीरिजची घोषणा करण्यात आली असून आणखीनही कलाकार या सीरिजमध्ये त्यांचं योगदान देणार आहेत.

आता पुन्हा एका मोठ्या हॉलिवूड प्रोजेक्टमध्ये शरद केळकरची निवड करण्यात आली आहे. मार्वेलच्या ऑडीबल सीरिजमधील ‘wolverine’ या सुपरहिरोला आता शरद केळकर स्वतःचा आवाज देणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. नुकतंच या सीरिजची घोषणा करण्यात आली असून आणखीनही कलाकार या सीरिजमध्ये त्यांचं योगदान देणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाकोला पोलिसांची मोठी कारवाई, ५ वर्षांच्या मुलीचं अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Supreme Court: निवडणुका रद्द करू नाहीतर निकाल आम्ही देऊ: सर्वोच्च न्यायालय

मुलगी झाली म्हणून सासरकडून छळ; आयुष्य 'नकोसे' झाल्यानं महिलेने संपवली जीवनयात्रा

Navi Mumbai : अलिबाग, गोव्यापेक्षाही सुंदर आहे नवी मुंबईतील 'हा' समुद्रकिनारा

T20 World Cup 2026 Schedule : टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक जाहीर; या दिवशी क्रिकेटचा महाकुंभमेळा होणार सुरू, रोहित शर्माकडं मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT