Shreyash Talpade: श्रेयस तळपदेला नेमकं झालं तरी काय?, 'तो' फोटो पाहून तुम्हीही असंच म्हणाल...

सध्या श्रेयसची एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे.
Shreyas Talpade
Shreyas TalpadeSaam Tv

Shreyash Talpade: 'माझी तुझी रेशीमगाठ' फेम प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. श्रेयस मराठी चित्रपटांसह बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली. सोबतच श्रेयसने सर्वांचेच मन जिंकले ते एका आवाजामुळे. पुष्पा चित्रपटात श्रेयसने अल्लू अर्जूनच्या भूमिकेला आवाज दिला होता. सध्या श्रेयसची एक पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. त्यात त्याचा हा फोटो नक्की कोणता आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही.

Shreyas Talpade
Akshay Kumar And Nora Fatehi Viral Video: 'लग्न झालंय विसरलास का?' नोरासोबतचा डान्स अक्षयच्या अंगलट... ट्विंकलची दिली धमकी

नुकतेच सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये श्रेयसचे तोंड रक्ताने माखलेला दिसत आहे, जे पाहून चाहते नक्कीच विचारात पडलेले दिसत आहे. हे फोटो शेअर करताना त्याने संपूर्ण कथाही सांगितली. चित्रपटाची कथाही चाहत्यांसोबत शेअर केली. हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा भाग कसा आहे हे त्याने सांगितले. वास्तविक श्रेयस तळपदेने 'द हँगमॅन' चित्रपटाची कथा शेअर केली आहे. त्याने सांगितले की, त्याने 'इक्बाल'च्या आधी या चित्रपटाची शूटिंग सुरू केली होती.

Shreyas Talpade
Bigg Boss 16 Winner: एमसी स्टॅन की प्रियांका? कोण ठरणार 'बिग बॉस 16'चा विजेता, शिवाचे चाहते मात्र हैराण

श्रेयस तळपदे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणतो, CIRCA 2004... द हँगमॅन... इक्बाल रिलीज होण्यापूर्वी मी 'द हँगमॅन' या चित्रपटाचे शूटिंग केले होते. मला हा चित्रपट दिल्याबद्दल फहीमचे आभार. आज मी आठवणींच्या चौकटीतून ही गोष्ट शेअर करत आहे.

श्रेयस तळपदेने अनेक फोटो शेअर केले आहेत. पहिल्या चित्रात त्याचा चेहरा रक्ताने माखलेला दिसत आहे तर दुसऱ्या चित्रात तो ओम पुरींसोबत दिसत आहे. एका फोटोत तो एका चार मजली इमारतीवर उभा असल्याचे दिसत आहे. हा किस्साही त्याने पोस्टमध्ये शेअर केला आहे.

Shreyas Talpade
Priya Berde: प्रिया बेर्डेंनी राष्ट्रवादीची साथ सोडली, भाजपात केला जाहीर प्रवेश, घड्याळ काढून हातात घेतले कमळ

हिंदी चित्रपट अभिनेता ओम पुरी आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यासोबतचा हा माझा पहिला चित्रपट होता. मी त्यांचा मुलगा असल्याप्रमाणे त्यांनी माझी काळजी घेतली. आम्हाला अजूनही तुमची आठवण येते ओम पुरी सर. स्मिता जयकर मॅडमने माझ्या आईची भूमिका केली होती आणि नाजनीनने माझ्या मैत्रिणीची भूमिका केली होती.

या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भंडारी यांनी केले होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले आणि ही चित्रे मला त्यांची आजही नेहमीच आठवण करून देते. एकूणच... या चित्रपटाने मला खूप काही दिले आहे. बिपिनभाई, असाच आणखी एक चित्रपट बनवण्याची वेळ आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com