मुंबई : बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानने(ShahRukh Khan) २५ जून रोजी चित्रपटसृष्टीत ३० वर्षे पूर्ण केली आहेत. किंग खानचे जगभरातील चाहते त्याचे पोस्टर्स आणि गाणी सोशल मीडियावर पोस्ट करून त्याच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. यावेळी किंग खान चाहत्यांसोबत लाइव्ह आला आणि त्याने त्याच्या चाह्त्यांसोबत भरपूर गप्पा मारल्या. या सेलिब्रेशनमध्ये त्याची पत्नी गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम(Instagram) अकाउंटवर किंग खानच्या नावाने एक खास पोस्ट शेअर केली आहे. जी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शाहरुख खानने या ३० वर्षांत एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण या ३० वर्षांचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्याने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेतली. पत्नी गौरी खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटाचे नवीन मोशन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरसोबत तिने एक भावनिक कॅप्शन देखील लिहिले आहे.
शाहरुख खानच्या आगामी 'पठाण' चित्रपटाच्या नवीन मोशन पोस्टरसोबतच गौरी खानने शाहरुखसाठी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'वडील, पती, मित्र याशिवाय तो काय करतो आणि तो लोकांच्या जीवनावर कसा परिणामकारक ठरतो हे समजून घेणे माझ्यासाठी कठीण आहे. मला फक्त एकच गोष्ट माहिती आहे की तो कालच्या तुलनेत आज जास्त मेहनत करण्याचा प्रयत्न करतो.
गौरी खानची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शाहरुख खानच्या चाहत्यांना ही पोस्ट खूपच आवडली आहे.
पोस्टरमध्ये शाहरुख खान पांढरा शर्ट आणि जीन्स घातलेला दिसत आहे. त्याच्या हातात बंदूक आहे. त्याचा चेहरा अर्धापण रक्ताच्या डागांनी झाकलेला दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुखचा व्हॉईसओव्हर ऐकू येतो, ज्यामध्ये तो म्हणतो, 'लवकरच भेटूयात पठाणला.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.