

मुंबई : 'जुग जुग जिओ'(jug jug jiyo) प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री कियारा अडवाणी(kiara advani) आणि अभिनेता वरुण धवन(varun dhawan) आपापल्या पुढील प्रोजेक्टमध्ये व्यग्र झाले आहेत. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वरुणने 'बावल' या त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रिकरणामधून ब्रेक घेतला होता. चित्रपट प्रदर्शित होताच तो 'बावल'च्या पुढील चित्रिकरणासाठी अॅमस्टरडॅमला रवाना झाला आहे. नितेश तिवारी 'बावला'या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. त्याचवेळी कियारा 'जुग जुग जिओ'च्या प्रमोशन आणि रिलीजनंतर तिच्या पुढच्या प्रोजेक्टमध्येही व्यग्र झाली आहे. ती विक्की कौशलसोबत 'गोविंदा नाम मेरा' गाण्याचे चित्रीकरण करणार आहे.
'गोविंदा नाम मेरा' या गाण्याचे चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी रिहर्सल होणार आहे. कियारा अडवाणी पुढील काही दिवस 'जुग जुग जिओ'चे प्रमोशन करणार असून याचदरम्यान ती गाण्याचे शूटिंगही करणार असल्याचे बोलले जात आहे.
विक्की कौशल पत्नी कतरिना कैफसोबत न्यूयॉर्कमध्ये सुट्टी घालवून भारतात परतल्यानंतर कियारासोबत गाण्याचे शूटिंग पूर्ण करायला सुरवात करणार आहे. हे गाणे मुंबईतील एका खास सेटवर चित्रीत होणार आहे. 'गोविंदा नाम मेरा'च्या चित्रीकरणाचा हा शेवटचा भाग असून त्यानंतर चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होणार आहे.
गोविंदा वाघमारेची भूमिका साकारणार विक्की कौशल...
या चित्रपटात भूमी पेडणेकरही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची घोषणा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झाली होती. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटात विक्की कौशल गोविंदा वाघमारेची भूमिका साकारत आहे. तर भूमी त्याचा पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना त्याने 'गोविंदा की हॉट वाईफ' असे लिहिले आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे 'गोविंदा नाम मेरा'ची निर्मिती केली आहे. 'गोविंदा नाम मेरा'चे दिग्दर्शक शशांक खेतान असून, धर्मा प्रॉडक्शन व्यतिरिक्त, करण जोहर, हिरू यश जोहर, अपूर्व मेहता आणि वायाकॉम 18 हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.