धैर्य, ढुंग्या आणि कबीर पुन्हा प्रक्षकांच्या भेटीला; ‘बॉईज ३’चा धमाकेदार टीझर प्रदर्शित

आता पुन्हा एका हे बॉईज दंगा करायला तयार झाले आहेत.
Marathi Movie Boyz 3
Marathi Movie Boyz 3Saam Tv
Published On: 

मुंबई - ‘टाईमपास ३’ नंतर आणखी एका धमेदार चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या दोन भागांनी प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केल्यानंतर आता ‘बॉईज ३’ या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे. आता पुन्हा एका हे बॉईज दंगा करायला तयार झाले आहेत. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. 'बॉईज 3' ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट कधी एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली होती. १६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या टीझरमध्ये धैर्य, ढुंग्या आणि कबीर हे तीन पात्र दिसून येत आहे. हे तिघेही दाक्षिणात्य पेहरावामध्ये दिसत आहे. ‘बॉईज ३’ एक नव्या मुलीची एण्ट्री पाहायला मिळत आहे. पण ही अभिनेत्री नेमकी कोण? हे अद्याप गुलदस्त्यात आहे. आता या मुलीचे येण्याने धैर्य, ढुंग्या आणि कबीर काय रंग उधळणार, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

Marathi Movie Boyz 3
मोठी बातमी! शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या घरांना केंद्राकडून सुरक्षा

‘बॉईज’ चित्रपटामधील धैर्य, ढुंग्या आणि कबीर या तिघांनी प्रेक्षकांना अगदी वेड लावलं. चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिल्यानंतर आता पुन्हा एकदा ‘बॉईज ३’च्या टीझरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे. १६ सप्टेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com