Shahrukh Khan Dance Video: नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर उद्दघाटन झाल्यानंतर अंबानींनी एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीमध्ये केवळ बॉलिवूड सेलिब्रिटी नाही तर टॉम हॉलंड, झेंडाया, गिगी हदीद आणि पेनेलोप क्रूझ यांसारखे हॉलिवूड स्टार देखील उपस्थित होते. कालच्या अंबानीच्या पार्टीतील फोटो आणि व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
शाहरुख खान, वरुण धवन आणि रणवीर सिंग स्टेजवर येण्यापासून ते प्रियांका चोप्रा तिच्या दिल धडकने दो स्टारसोबत डान्स करण्यापर्यंत किंवा वरूणने गीगीला स्टेजवर खेचून आणण्यापर्यंत अनेक धमाकेदार गोष्टी कालच्या पार्टीत घडल्या.
'एनएमएसीसी' कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी शाहरुख रेड कार्पेटवर दिसला नाही. मात्र त्याच्या या कार्यक्रमादरम्यानचा लूक तुफान व्हायरल झाला. काल दिवसभर फक्त शाहरुख त्या लूकची चर्चा होती. 'एनएमएसीसी'च्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अभिनेता रेड कार्पेट होस्ट करत असलेल्या अनुष्का दांडेकरशी संभाषण करताना दिसला.
नीता अंबानीसह एका दशकाहून अधिक वेळ या सांस्कृतिक केंद्र काम करत होत्या यावरही शाहरुखने त्याच्या भावना व्यक्त केल्या. याबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला, नीता अंबानी त्यांनी या प्रकल्पाला ‘कलाप्रेमी’च्या ‘पॅशन’पैकी एक म्हटले.
या क्षणाचे एका शब्दात वर्णन करायला सांगितल्यावर शाहरुख म्हणाला, “मी याला नेत्रदीपक, विलक्षण आणि मंत्रमुग्ध करणारा कार्यक्रम म्हणू शकतो. पण इथे आल्यावर मला माझ्या आयुष्यात काय निसटले आहे याची आठवण झाली आणि त्यामुळे मला प्रेरणा मिळाली.”
शनिवारी शाहरुख खाननेही सर्व प्रेक्षकांना त्याच्या डान्सन खुश केले. “झूम जो पठान” वर शाहरुखने ठेका ठरला. स्टेजजवळ उभ्या असलेल्या वरुण धवनला आणि रणवीर सिंगला शाहरुखने स्टेजवर बोलावले. या तिघांनी मिळून “झूम जो पठान” गाण्यावरील हुक स्टेप केल्या. त्यांना एकत्र नाचताना पाहून प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.
तर आणखी एका व्हिडिओमध्ये प्रेक्षक 'देश का सावल है...' हा पठानमधील डायलॉग वापरून 'वन्स मोअर'ची विनंती करताना दिसत आहेत. आता इतकंच, नाहीतर मला दम लागेल आणि मरेन.
त्यानंतर हे तिघे एपी धिल्लनच्या “ब्राऊन मुंडे” मध्ये पुन्हा एकत्र थिरकले. गायकाने त्याच्या सोशल मीडियावर पठान सोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. “पार्टी अगर अंबानी के घर पे रखोगे तो पठान मेहमानवाजी के लिए तो आएगा ही” लोकप्रिय डायलॉगला ट्विस्ट देत धिल्लन कॅप्शन दिले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.