Shah Rukh Khan On John Abraham  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: 'पठाण' चित्रपटामध्ये एकत्र काम केल्यानंतर शाहरुखने व्यक्त केले जॉन अब्राहमबद्दलचे वेगळे मत

चार वर्षांहून अधिक कालावधीनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान, जॉन अब्राहमसोबत आगामी चित्रपट 'पठाण'मध्ये स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शाहरुख खानने जॉनला शांत आणि सुसंकृत व्यक्ती म्हटले आहे.

शाहरुखने शनिवारी त्याच्या चाहत्यांसोबतच्या प्रश्नोत्तर सत्रात हे विधान केला आहे; कार्यक्रमादरम्यान एका चाहत्याने त्याला जॉनसोबत चित्रपटात काम केल्याच्या अनुभवाविषयी विचारले.

चाहत्यांच्या या प्रश्नावर शाहरुख खानने उत्तर देत म्हटले की, "जॉनला अनेक वर्षांपासून ओळखत आहे, त्याच्यासोबत काम करणे खूप आनंददायी अनुभव होता. तो सर्वात शांत आणि सुसंकृत व्यक्तींपैकी एक आहे." (Shah Rukh Khan)

चार वर्षांहून अधिक कालावधीनंतर शाहरुख मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. 'पठाण' हा त्याच्या तीन चित्रपटांपैकी हा पहिला चित्रपट आहे. याआधी, तो 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिरो' चित्रपटात दिसला होता. 'झिरो' चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करता आली नव्हती. (Movie)

'पठाण'मध्ये एका भारतीय गुप्तहेराची कथा दाखविण्यात आली आहे. यशराज फिल्म्सने 'पठाण' चित्रपटाची निर्मिती केली आहे. 25 जानेवारी, 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाऊबीजेच्या दिवशी सोन्याला ओवाळणी, चांदी रूसली, सुवर्णनगरीत १ तोळ्याला किती भाव? जाणून घ्या

Rohit Sharma Record : रोहित शर्मानं ऑस्ट्रेलियात रचला इतिहास; विराट, सचिन तेंडुलकरही मागे पडले

Kalyan: दोन गटात तुफान राडा, दगडफेक- तोडफोड अन् हाणामारी; एकमेकांची डोकी फोडली; VIDEO व्हायरल

Festive Car Sales: सणासुदीच्या काळात 'या' ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या, वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra Live News Update: कार्यकर्त्यांवर होणाऱ्या संभाव्य खोट्या गुन्ह्यांना उत्तर देण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या नेत्याची 'अनोखी शक्कल'

SCROLL FOR NEXT