Shahid kapoor daughter Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahid kapoor: शाहिदच्या लेकीने बनवलाय आईसाठी खास पदार्थ; मीरा फोटो शेअर करत म्हणाली,माझ्या लाडक्या लेकीने...

Meera Rajput Share Photo Of Desert Made By Daughter: शाहिद कपूर हा अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहिदची पत्नी मीरा नेहमी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा नेहमी त्याच्या अभिनयामुळे चर्चेत असतो. शाहिद चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. शाहिदची पत्नी मीरा ही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतंच मीराने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. मीरा आणि शाहिदच्या लेकीने तिच्यासाठी बनवलेल्या जेवणाचा फोटो मीराने शेअर केला आहे.

शाहिदची लेक मिशाने आईसाठी स्पेशल डिनर प्लान केला होता. तिने घरात आईला रेस्टॉरंटसारखं स्पेशल ट्रीट केलं आहेत. मिशाने स्वतः बनवलेल्या जेवणाचे फोटो मीराने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात शाहिदची लेक सर्वांना टेबलवर जेवणासाठी बसण्यास सांगत आहे. या फोटोत टेबलवर व्हाईट कलरच्या पेपरवर 'रिझर्व्ह' असं लिहलं आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या पदार्थांची नावे लिहली आहेत.

या फोटोवर मीराने खास कॅप्शन लिहलं आहे. 'आईने बनवलेले जेवण आणि मिशाने बनवलेला गोड पदार्थ ! मी खूप जास्त लक्की आहे. आईने बनवलेली पॅड थाय आणि करीसोबत जास्निन राईस. त्याचसोबत लाडक्या लेकीने बनवलेला ऑरेंज केक, अॅपल पाय आणि ट्रुटु फ्रूटी खूपच चविष्ट होती'. लेकीने बनवलेले हे जेवण मीराला खूपच आवडल्याचे दिसत आहे.

शाहिद आणि मीराला मिशा आणि झैन अशी दोन मुले आहेत. मिशा ८ वर्षांची तर झैन पाच वर्षांचा आहे. शाहिदने झैन आणि मिशाला पापाराझीपासून लांब ठेवलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: खुशखबर! आता PFचे पैसे UPI ने मिनिटात खात्यात जमा होणार, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Skin Tips: मऊ आणि मुलायम त्चचेसाठी रात्री चेहऱ्यावर काय लावावे?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Celebrity Style Mangalsutra: सेलिब्रिटीस्टाईल शॉ्र्ट आणि युनिक मंगळसूत्र हवेत? हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT