Shah Rukh Khan Response To Fans Question  Twitter
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan In #AskSRK Session : शाहरूखच्या 'जबरा' फॅनने विचारला विचित्र प्रश्न; किंग खाननंही दिलं भन्नाट उत्तर

Shah Rukh Khan's Fans : शाहरुख खानने चाहत्यांसोबत एसआरके सेशन केले.

Pooja Dange

Shah Rukh Khan Response To Fans Question : शाहरुख खानने नुकतीच बॉलिवूडमध्ये ३१ वर्षे पूर्ण केली आहेत. 25 जून 1992 रोजी 'दीवाना' या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 31 वर्षे पूर्ण झाल्यावर, शाहरुखने चाहत्यांसह ट्विटरवर आस्क एसआरके हे सेशन केले.

दरम्यान चाहत्यांनी शाहरुखला काही भन्नाट प्रश्न विचारले, ज्यांना शाहरुखने मजेशीर उत्तरे दिली. एका चाहत्याने शाहरुखला एकत्र सिगारेट ओढण्याबद्दल विचारले. यावर शाहरुखने काय उत्तर दिले, चला जाणून घेऊया. (Latest Entertainment News)

शाहरुख खानने चाहत्यांसोबत एसआरके सेशन केले. शाहरुखने त्याच्या ट्विटरवर लिहिले की, दिवाना रिलीज होऊन 31 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचा हा प्रवास खूपच रोमांचक आहे.'

एका चाहत्याने शाहरुखला विचारले की त्याच्या 'दीवाना'च्या सेटवरील काही कधीही विसरू न शकणाऱ्या आठवणी आहेत का? तेव्हा शारुखने सांगितले की त्याला दिव्या जी (दिव्या भारती) आणि राजजी यांच्यासोबत काम करायचे आहे.

दुसऱ्या एका चाहत्याने शाहरुखला विचारले की, 'दीवाना'मधील त्याचा एन्ट्री सीन कसा वाटला. याला उत्तर देताना शाहरुख म्हणाला की, 'मी हेल्मेट घालायला हवं होतं!' तर आणखी एका चाहत्याने शाहरुखला सिगारेट ओढण्याची ऑफर दिली, ज्याला शाहरुखने भन्नाट उत्तर दिले.

'आपण एकत्र सिगारेट प्यायला जायचं का?', असा चाहत्याचा प्रश्न होता. याला उत्तर देताना शाहरुखने लिहिले की, 'माझ्या वाईट सवयी मी एकटाच करतो.' शाहरुखच्या या उत्तराने चाहत्यांची मने जिंकली.

शाहरुखच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने तब्बल ४ वर्षांनी 'पठान' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले. आता तो लवकरच अॅटलीच्या 'जवान' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यात नयनतारा आणि विजय सेतुपती देखील दिसणार आहेत. याशिवाय शाहरुख राजकुमार हिरानीच्या 'डंकी' या चित्रपटातही दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Shave Bhaji Recipe : एक टोमॅटो अन् वाटीभर शेव, रात्रीच्या जेवणाला झटपट बनवा 'हा' पदार्थ

Ashadh Wari: विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलेल्या वारकऱ्याला अमानुष मारहाण, पंढरपुरात सुरक्षा रक्षकांची मुजोरी|VIDEO

Language Row : मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढणाऱ्या व्यापाऱ्यांची दिलगिरी; मराठी अस्मिता मोर्चाआधीच निर्णय

Amravati News: अमरावतीत बॉम्बची अफवा, 'या' परिसरात शोधमोहीम सुरू, पोलिसांचा मोठा फौजफाटा|VIDEO

Salt Scrub : मीठाचे पाणी त्वचेसाठी चांगले आहे का?

SCROLL FOR NEXT