Jawan Trailer OUt Instagram @girijaoakgodbole
मनोरंजन बातम्या

Jawan Trailer Released : मैं कौन हूँ... जवानमध्ये शाहरुख झाला व्हिलन, ट्रेलर प्रदर्शित

Shah Rukh Khan Jawan Movie : शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

Pooja Dange

Shah Rukh Khan's Movie Jawan Trailer Out : शाहरुख खानचा आगामी चित्रपट 'जवान'ची सध्या चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी त्याची घोषणा करणारे मोशन पोस्टर रेड चिलिज एंटरटेनमेंट शेअर केले होते. या पोस्टरमध्ये जवानचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार सांगितले होते.

शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित 'जवान' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमध्ये शाहरुखची वेगवगेळी रूप पाहायला मिळत आहेत. चला तर पाहूया कसा आहे शाहरुखच्या 'जवान'चा ट्रेलर.

'जवान'च्या ट्रेलर सुरुवात एका गावापासून होते. गावामध्ये धार्मिक सोहळा होत असताना गाडी गाड्यातून बंदूक घेऊन लोक येतात आणि सगळीकडे अनागोंदी माजते. तेव्हा शाहरुखचा व्हॉइस ओव्हर येतो आणि तो चित्रपटाची स्टोरी सांगू लागतो. त्यानंतर शाहरुखच्या जन्म ते तो आयपीएस अधिकारी होण्याचे काही क्षण दाखविण्यात आले.

चित्रपटामध्ये स्त्रियांची एक टीम आहे जी शाहरुखची तयार केली आहे. यामध्ये मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक देखील दिसत आहेत. ही मुलींची टीम ऍक्शन करताना दिसत आहेत. चित्रपटामध्ये दीपिका पुन्हा एकदा ऍक्शन करताना दिसत आहे. चित्रपटामध्ये शाहरुखचा डबल रोल आहे असे म्हटले जात होते. (Latest Entertainment News)

शाहरुखची विविध रूपं

ट्रेलरमध्य शाहरुखची विविध रूप दाखविण्यात आली. कधी तो पोलीस अधिकारी दिसतो. तर कधी मास्क लावून धमकावताना दिसतो. तर शाहरुखच्या एका लूकमध्ये त्याने हातात भाला घेतला आहे आणि त्याच्या अंगाला पट्ट्या गुंडाळलेल्या आहेत.

तर जवानमधील गाण्याची झलक दाखविण्यात आली आहे यामध्ये शारूखचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळत आहे. बोटात सिंहाची अंगठी आणि अर्ध्य चेहऱ्याला पट्ट्या असा व्हिलन लूक देखील चित्रपटामध्ये आहे. तर ट्रेलच्या शेवटी शाहरुखचा टक्कल असलेला लूक पाहायला मिळत आहे.

चित्रपटाची कास्ट

चित्रपटामध्ये शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, दीपिका पदुकोन, विजय वर्मा आणि गिरीजा ओक आहेत. चित्रपटाचे दिगदर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटलीने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT