Shah Rukh Khan Fly To The US For Treatment Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan News : शाहरुख खानला डोळ्यांचा गंभीर आजार, उपचारासाठी अमेरिकेत जाणार!

Shah Rukh Khan Fly To The US For Treatment : बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरूख खानबद्दल हेल्थ अपडेट समोर येत आहे.

Chetan Bodke

बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरूख खानबद्दल हेल्थ अपडेट समोर येत आहे. शाहरूख डोळ्यांवरील उपचारांसाठी तो परदेशात जाणार आहे. त्याने यापूर्वी मुंबईमध्ये डोळ्यांवर उपचार घेतले होते. पण मुंबईत त्याच्या डोळ्यांवर व्यवस्थित उपचार न झाल्याने अभिनेत्याने अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार, शाहरूख खान आपल्या डोळ्यांच्या इलाजासाठी अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये अभिनेत्याच्या डोळ्यांवर उपचार ठरल्यानुसार न झाल्यामुळे अभिनेता परदेशात उपचार घेणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरूख खान आज (३० जुलै) अमेरिकेला रवाना होणार आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किंग खान सोमवारी (२९ जुलै) मुंबईतील एका हॉस्पिटलमध्ये डोळ्यांच्या उपचारासाठी गेला होता. पण काही कारणास्तव त्याच्या डोळ्यांवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे अभिनेत्याने परदेशात जाण्याचा निर्णय घेतला आहे. नेमकं शाहरूख खानच्या डोळ्यांना काय झालं आहे ? याबद्दलची माहिती मिळालेली नाही.

या प्रकरणावर अभिनेत्याची मॅनेजर पूजा ददलानी हिने कोणतीही माहिती दिलेली नाही. याआधी २०१४ मध्ये शाहरुखच्या डोळ्यांवर सर्जरी केलेली होती. सर्जरीनंतर अभिनेत्याने ट्वीट करत डॉक्टरांचे आभार मानले होते. गेल्या काही दिवसांपूर्वीही अभिनेत्याला रुग्णालयात दाखल केले होते. आयपीएलचा सामना पाहण्यासाठी किंग खान अहमदाबादला गेला होता. अभिनेत्याला उष्माघाताचा त्रास झाला होता. त्यामुळे त्याला अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT