Shah Rukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan: शाहरुख खानला सुप्रीम कोर्ट कडून मोठा दिलासा; मन्नतच्या कामाला विरोध करणाऱ्यांना सुनावले खडेबोल

Actor Shah Rukh Khan: सर्वोच्च न्यायालयाने शाहरुख खानच्या 'मन्नत'च्या नूतनीकरणाविरोधातील याचिका फेटाळली. मंजुरीतील अनियमिततेचे आरोप फेटाळत न्यायालयाने काम सुरू ठेवण्यास हिरवा कंदील दिला आहे.

Shruti Vilas Kadam

Shah Rukh Khan: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान यांच्या मुंबईतील प्रसिद्ध बंगला 'मन्नत'च्या रेनोव्हेशन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मंगळवारी (१४ जुलै) न्यायालयाने 'मन्नत'च्या नूतनीकरणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावत, याकामासाठी मिळालेल्या सर्व परवानग्या योग्य असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे बंगल्याच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाचे काम सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नेमके प्रकरण काय होते?

मुंबईतील एका रहिवाशाने 'मन्नत'च्या नूतनीकरणासाठी देण्यात आलेल्या मंजुरीमध्ये चुकीचा व्यवहार झाल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या व्यवहाराची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच नूतनीकरणाच्या कामावर स्थगिती देण्याचीही विनंती करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण

सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या हेतूंवर प्रश्न उपस्थित केले. प्राथमिकदृष्ट्या ही याचिका योग्य कारणांसाठी दाखल करण्यात आल्याचे दिसत नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, नूतनीकरणाच्या व्यवहारात कोणतीही चुकीचा प्रकार आढळून न आल्याने याचिका फेटाळण्यात आली. यासोबतच नूतनीकरणाच्या कामाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.

सध्या कुठे राहत आहे शाहरुख खानचे कुटुंब?

'मन्नत'मध्ये सध्या रेनोव्हेशनचे काम सुरू असल्यामुळे शाहरुख खान आणि त्याचे कुटुंब तात्पुरते दुसऱ्या निवासस्थानी राहायला गेले आहे. शाहरुख, गौरी खान तसेच त्यांची मुले आर्यन, सुहाना आणि अबराम हे सध्या मुंबईतील पाली हिल परिसरातील एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहत आहेत. चित्रपट निर्माते वासू भगनानी यांच्या मालकीच्या इमारतीतील चार मजले त्यांनी भाड्याने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

'मन्नत'चा इतिहास

मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील बँडस्टँड परिसरात असलेले 'मन्नत' हे शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. ही 'ग्रेड-३' वारसा वास्तू (हेरिटेज प्रॉपर्टी) १९१४ मध्ये बांधण्यात आली होती. सुरुवातीला या बंगल्याचे नाव 'व्हिला व्हिएन्ना' असे होते. शाहरुख खानने २००१ मध्ये हा बंगला विकत घेतल्यानंतर त्याचे नाव बदलून 'मन्नत' ठेवले. आज 'मन्नत' हे केवळ शाहरुख खानचे घर नसून मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध लँडमार्कपैकी एक म्हणून ओळखले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MP Disqualification: आता सुप्रीम कोर्टात होणार बंडखोर खासदारांचा फैसला; २०खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Chandrapur Firing: न्यायालयासमोरच गोळीबार! नाराळपाणी दुकानावर उभ्या असलेल्या तरुणावर धाडधाड झाडल्या गोळ्या

साखरेचे दर शंभरी पार जाणार? ऐन सणासुदीत साखर क़डू

नागपूरमध्ये क्लोरीन वायूची गळती, 40 जणांवर उपचार, 5 गंभीर, जलशुद्धीकरण प्रकल्प भरवस्तीत कसा?

कचोरी आणि बिर्याणीत उंदरांच्या लेंड्या, किळसवाण्या प्रकारामुळे नागरिकांचा संताप

SCROLL FOR NEXT