Aamir Khan: बॉलिवूड अभिनेता आमिर खानने त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच घरगुती पद्धतीने तिसरं लग्न त्याची गर्लफ्रेंड आणि फॅशन डिझाईनर गौरी स्प्रॅटसोबत लग्न केल. या लग्नानंतर आमिर खान 'लव्ह जिहाद'चा ब्रँड अॅम्बेसिडर आहे असं म्हणतं. बजरंग दलासह अनेक हिंदू संघटनांनी त्याच्यावर 'लव्ह जिहाद'चा (Love Jihad) आरोप केला आहे. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत या आरोपांवर स्पष्ट भाष्य केलं आहे. तसेच त्याने त्याची बायको गौरी स्प्रॅट ही आजही ख्रिश्चन धर्माचे पालन करते आणि त्याच्या दोन्ही एक्स पत्नी रीना दत्ता व किरण राव यांनीही कधीच धर्मांतर केले नव्हते हे देखील स्पष्ट केले.
'डेक्कन क्रॉनिकल' ला दिलेल्या मुलाखतीत आमिर खान म्हणाला, "लोक माझ्याबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी बोलतात. मात्र सत्य हे आहे की माझ्या आयुष्यातील कोणत्याही नात्यात मी कधीच धर्माचा मुद्दा आणला नाही. गौरी आजही ख्रिश्चन आहे. रीना दत्ता आणि किरण राव यांनीही इस्लाम स्वीकारलेला नाही. प्रत्येकाला आपल्या श्रद्धेनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार आहे."
त्याने पुढे सांगितले की, माझ्या दोन्ही बहिणींची लग्न हिंदू पुरुषांशी झाले आहेत आणि माझ्या मुलीच लग्नही एका हिंदू पुरुषाशी झालं आहे. माझा चुलतभाऊ मन्सूर याने एका ख्रिश्चन महिलेशी विवाह केला आहे. कोणतही नातं हे परस्परांचा आदर, विश्वास आणि प्रेम यावर टिकून असतात. धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे आणि त्यावरून कोणाच्याही नात्याला जज करणे योग्य नाही. समाजात पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवण्याऐवजी सत्य जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचेही त्याने नमूद केले.
आमिर आणि गौरी स्प्रॅट यांच्या नात्याची चर्चा काही महिन्यांपासून सुरू आहे. स्वतः आमिरनेच माध्यमांसमोर गौरीची ओळख करून दिली होती. दोघे अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते आणि अखेर त्यांनी ५ जुलै ला खासगूी पद्धतीने लग्न केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.