Shah Rukh Khan Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan Accident : शाहरूख खानचा अमेरिकेत अपघात; शूटिंगवेळी घडली दुर्घटना, सर्जरी करावी लागली

Shah Rukh Khan Surgery : शाहरुख खानला शूटिंगवेळी अपघात झाला आहे. त्याला सर्जरी करावी लागली आहे.

Pooja Dange

Shah Rukh Khan Mate With An Accident : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे ही दुर्घना घडली आहे. शाहरुख खानच्या नाकाला दुखापत झाली आहे. त्याची एक छोटी सर्जरी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तरी काळजी कारण्याचे काही कारण नाही असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

लॉस एंजेलिसमध्ये एका प्रोजेक्टच्या शूटिंग दरम्यान, शाहरुख खानच्या नाकाला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला किरकोळ शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही घटना कशी आणि केव्हा घडली याबद्दल अद्याप साविसथर माहिती समजू शकलेली नाही. (Latest Entertainment News)

ETimes ने दिलेल्या वृत्तनुसार, एका स्त्रोताने शेअर केले की, "SRK लॉस एंजेलिसमध्ये एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होता आणि त्याच्या नाकाला दुखापत झाली. त्याला रक्तस्त्राव सुरू झाला. त्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.

त्याच्या टीमला डॉक्टरांनी कळवले की काळजी करण्यासारखे काही नाही आणि किंग खानचा रक्तस्त्राव थांबवण्यासाठी किरकोळ शस्त्रक्रिया करावी लागेल. ऑपरेशननंतर, SRK नाकावर पट्टी बांधलेला दिसेल." वृत्तानुसार, शाहरुख खान आता मुंबईत आला असून आणि त्याच्या घरी आराम करत आहे.

दरम्यान, शाहरुख खानच्या 'जवान'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे. शाहरुख खान या चित्रपटामध्ये कधीही न पाहिलेल्या अवतारात दिसणार आहे. प्रख्यात चित्रपट निर्माते अॅटली यांच्यासोबतचे त्याचा हा पहिले चित्रपट आहे. जवान व्यतिरिक्त, एसआरकेकडे राजकुमार हिरानीची डंकी देखील आहे, या चित्रपटामध्ये तापसी पन्नूसोबत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Business idea: डाळ मिल नाहीतर आहे रोजगार अन् पैशाचा कारखाना; गावातच सुरू करा धमाकेदार बिझनेस

Mumbai one App : खूशखबर! मुंबईत आता एका तिकिटावर कुठेही फिरा, PM नरेंद्र मोदींकडून हटके अॅप लाँच

Dry Lips Tips: ओठ खूपच कोरडे पडलेत? मग या घरगुती टिप्सने करा मऊ अन् मुलायम

Increasing arthritis: २०-४० वयोगटातील लोकांना संधिवाताचा धोका वाढला, 'या' एका कारणाने बळावतेय समस्या

SCROLL FOR NEXT