Shah Rukh Khan- King saam tv
मनोरंजन बातम्या

Shah Rukh Khan - King : डर नहीं, दहशत हूं...; 'किंग'ची दहाड, 'या' दिवसापासून थिएटरमध्ये शाहरुख खानचे राज्य, चित्रपटाची रिलीज डेट समोर

Shah Rukh Khan- King Release Date Announcement : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने 'किंग' चित्रपटची रिलीज डेट जाहीर केली आहे. एक खास व्हिडीओ शेअर करून त्याने ही माहिती दिली आहे.

Shreya Maskar

शाहरुख खान 'किंग'मुळे चांगलाच चर्चेत आहे.

'किंग' चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे.

'किंग' मध्ये शाहरुख खान लेकीसोबत झळकणार आहे.

अखेर बहुप्रतिक्षित चित्रपट 'किंग' ची तारीख जाहीर करण्यात आली आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने एका खास अंदाजात व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. गेले अनेक वर्ष चाहते KING चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत होते. अखेर यावर्षी होत क्षण येणार आहे. 'किंग' 2026 लाच रिलीज होणार आहे. चित्रपटाची रिलीज डेट जाणून घेऊयात.

'किंग' चित्रपटाची रिलीज डेट काय?

शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट 24 डिसेंबर 2026ला रिलीज होत आहे. म्हणजेच ख्रिसमसला किंग आपल्या भेटीला येणार आहे. या व्हिडीओला त्याने खूप खास कॅप्शन दिलं आहे. लिहिलं की, "किंग चित्रपटगृहांमध्ये गर्जना करण्यास सज्ज आहे..." त्यांच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकार मंडळी तुफान कमेंट्स करत आहेत. तसेच सिनेमासाठी किंग खानला शुभेच्छा देताना दिसत आहे.

शाहरुख खानला दुखापत

'किंग' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानच्या हाताला दुखापत झाली. 'किंग'मध्ये शाहरुख खान जबरदस्त अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्या 'डर नहीं, दहशत हूं...' या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. शाहरुख खान 'किंग' मध्ये 'अंडरवर्ल्डचा किंग'च्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचे बोले जात आहे.

'किंग' चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंदने केले आहे. शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.चित्रपटात बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण देखील झळकणार आहे. तसेच या चित्रपटात किंग खान आपल्या लेकीसोबत दिसणार आहे. सुहाना खान देखील चित्रपटाचा एक भाग आहे. त्यामुळे चाहेत बाप-लेकीला एकत्र पाहण्यास उत्सुक आहेत. 'किंग' हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT