Jawan Connection With Holiday In Delhi Instagram
मनोरंजन बातम्या

Jawan Connection With Holiday In Delhi: दिल्लीकरांना ३ दिवस सुट्टी जाहीर! शाहरुखच्या फॅन्सनी जोडलं जवानसोबत कनेक्शन, वाचा सविस्तर

Jawan Film: केजरीवाल सरकारने दिल्लीतील शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालयांना ८ ते १० सप्टेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.

Chetan Bodke

Jawan Connection With Holiday In Delhi

शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट येत्या ७ सप्टेंबरपासून थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी अवघे काही दिवसच शिल्लक असून अभिनेत्याचा हा दमदार ॲक्शन असलेला चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सूक दिसत आहेत. यासगळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एका निर्णयावरुन चर्चेला सुरुवात झाली आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीतील शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालयांना ८ ते १० सप्टेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. आता नेमकी ही सुट्टी कशासाठी दिली आहे, याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे.

येत्या ७ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता ॲक्शन सीनमध्ये दिसणार आहे. केजरीवाल सरकारने दिल्लीतील शाळा, सरकारी आणि खासगी कार्यालयांना ८ ते १० सप्टेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. जी २० शिखर परिषदेमुळे केजरीवाल सरकारने ही सुट्टी जाहीर केली आहे. या तीन दिवसांच्या सुट्टीमध्ये दिल्लीकरांना शाहरूखचा ‘जवान’पाहण्यासाठी उत्तम पर्याय असल्यामुळे त्या तीन दिवसात चित्रपट चांगलीच कमाई करण्याची शक्यता आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने तीन दिवसांच्या सुट्टीची माहिती देताच नेटकऱ्यांनी या सुट्टीचे कारण थेट ‘जवान’चित्रपटासोबत जोडले आहे. यावर काही नेटकरी म्हणतात, “खरं सांगा मुख्यमंत्रीजी, हे तुम्ही सर्व शाहरूखच्या ‘जवान’चित्रपटासाठीच करीत आहात ना?, नक्कीच आता ब्लॉकबस्टरचा बोर्ड झळकणार...” तर आणखी एक युजर म्हणतो, “ जवान चित्रपट पाहण्यासाठी ही उत्तम वेळ आहे.” दिल्लीतले प्रेक्षक जी २० च्या या सुट्टीचा कसा लाभ घेतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Bollywood Film)

याआधी तामिळनाडू सरकारने, ‘जेलर’ चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यावेळी खास चित्रपट पाहण्यासाठी नागरिकांना सुट्टी दिली होती. तामिळनाडूमध्ये रजनीकांत यांचा कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सुट्टी दिली जाते. रजनी यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. (Entertainment News)

शाहरूखचा हा ‘जवान’ चित्रपट बहुचर्चित चित्रपटांपैकी आहे. शाहरूखचे या वर्षात एकूण तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्यातील ‘जवान’ हा दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये शाहरूखसोबत नयनतारा, विजय सेथुपती, सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि सुनील ग्रोवर सह अनेक सेलिब्रिटी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. सध्या जवानच्या ॲडव्हान्स बुकिंगची चर्चा जोरदार सुरु झाली आहे. अमेरिकेमध्ये जवानच्या ॲडव्हान्स बुकिंगला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच दमदार कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT