Shahrukh Khan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shahrukh Khan: शाहरुख टॉम क्रूझ, जॅकी चॅनपेक्षाही श्रीमंत! वार्षिक कमाई पाहून थक्क व्हाल, 'किंग खान' कुठून कमावतो एवढे पैसे...

गेल्या चार वर्षांत शाहरुख खानचा एकही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. पण तरीही तो जगातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या टॉप 5 यादीत कायम आहे.

Chetan Bodke

Shahrukh Khan: शाहरुख खान सध्या भारतात चांगलाच चर्चेत आहे. जरीही शाहरुख 'पठान' चित्रपटामुळे ट्रोल होत असला तरी, त्याचे चाहते आजही त्याची कलाकृती आवर्जुन पाहतात. शाहरुख खान हा भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे हे सर्वांनाच माहित आहे.

परंतु तुम्हाला माहित आहे का की शाहरुख खान जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? त्याच्याकडे किती मालमत्ता आहे? आणि त्याच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे? चला तर जाणून घेऊया त्याच्या उत्पन्नाबद्दल माहिती...

गेल्या चार वर्षांत शाहरुख खानचा एकही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. पण तरीही तो जगातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांच्या टॉप 5 यादीत कायम आहे. होय, चार वर्षांत एकही मोठा चित्रपट नसतानाही तो जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याची मालमत्ता टॉम क्रूझ आणि जॅकी चॅन सारख्या लोकप्रिय अभिनेत्यांपेक्षा जास्त आहे. जेरी सेनफेल्ड, टायलर पेरी आणि ड्वेन जॉन्सननंतर शाहरुख खान जगातील चौथा श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत येतो.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने ट्विटरवर जाहीर केलेल्या 'वर्ल्ड्स रिचेस्ट अॅक्टर्स'च्या यादीनुसार, शाहरुख या यादीत $770 दशलक्ष भारतीय रुपयानुसार 6,306 कोटी रुपयांची संपत्ती असलेला एकमेव भारतीय अभिनेता ठरला आहे. अमेरिकन कॉमेडियन आणि अभिनेता जेरी सेनफेल्ड $1 अब्ज संपत्तीसह या यादीत अव्वल आहे.

बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या शाहरुख खानकडे बराच बँक बॅलन्स आहे. येत्या २५ जानेवारीला 'पठान' चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सर्वात मोठ्या ब्रेक नंतर त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. किंग खान अनेक कंपनीचा ब्रँड्सच्या अॅम्बेसेडर असून या माध्यमातून तो पैसे कमवतो.

शाहरुख सध्या तरी ICICI, Byju's, BigBasket, Tag Heuer, Lux आणि Hyundai सह 14 ब्रँड्ससाठी जाहिरात करतो. याशिवाय त्याचे रेड चिलीज एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊसही देखील आहे. शाहरुखचे अनेक चित्रपट त्याच्याच प्रॉडक्शन हाऊसमधील असतात.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखचे सरासरी वार्षिक उत्पन्न $38 दशलक्ष अर्थात भारतीय रुपयानुसार एका वर्षात अंदाजे 313 कोटी रुपयांची तो कमाई करतो. फोर्ब्स इंडियाने २०१९ मध्ये दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत शाहरुख ६ व्या क्रमांकावर होता. तेव्हा त्याची कमाई १२४.३८ कोटी इतकी होती.

सोबतच २०१८ मध्ये, त्याला 13 वा क्रमांक मिळाला होता. त्याच्या उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये त्याची आयपीएलमधील टीमचाही समावेश आहे. SRK हा कोलकाता नाईट रायडर्स आणि वेस्ट इंडिजच्या स्थानिक T20 लीग संघ T&T नाइट रायडर्सचा मालक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Street Style Pani Puri : ठेल्यावर मिळते तसे परफेक्ट पाणीपुरीचे पाणी, 'हा' एका पदार्थ रेसिपी बनवेल चटकदार

SCROLL FOR NEXT