Gandhi Godse Ek Yudh : गोडसेच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर; टीकाकारांना दिले उत्तर, म्हणाला...

चिन्मयचे नाव समोर येताच अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
Gandhi Godse Ek Yudh
Gandhi Godse Ek YudhSaam TV
Published On

Gandhi Godse Ek Yudh : 'गांधी गोडसे- एक युद्ध' चित्रपटाची घोषणा होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सर्वांसमोर आले. चित्रपटात गोडसे ही भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकर साकारणार हे पोस्टरमधून समजले. चिन्मयचे नाव समोर येताच अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. अशात आता त्याने आपले मौन तोडले आहे. (Latest Chinmay Mandlekar News)

सोशल मीडियावर सातत्यान अभिनेत्यावर टीका केली जात आहे. अशात आता सुरू असलेल्या वादावर चिन्मयने देखील आपलं मत दिलं आहे. " चिन्मयने यावर म्हटले आहे की, " टीका आणि ट्रोल करण्यासाठी बुद्धीची गरज नाही. एक कलाकार म्हणून निर्माता म्हणून आपण आपलं काम केलं पाहिजे. हा चित्रपट माझ्याकडे आला तेव्हा मला या चित्रपटात एकच गोष्ट दिसली. ती म्हणचे या चित्रपटाची कथा. ", असे चिन्मय म्हणाला.

Gandhi Godse Ek Yudh
Gandhi Godse Ek Yudh: 'गांधी-गोडसे एक युद्ध' चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित, चिन्मय मांडेकर दिसणार 'या' भूमिकेत,

" जर चित्रपटातील माहिती सर्वांना मिळणे गरजेचे आहे तर तुम्ही चित्रपटात नायकाची किंवा खलनायकाची भूमिका साकारता याने काही फरक पडतं नाही. तुम्ही हिरो आहात, विलन आहात रावन आहात या गोष्टी माझ्यासाठी अजीबात महत्वाच्या नाहीत. होय, हे खरे आहे की, नथुराम गोडसे हे पात्र तुम्ही साकारलं तर अपोआप आपण वादांमध्ये अडकणार. कारण हे एक वादग्रस्त पात्र आहे. मात्र मी माझ्यावर होणाऱ्या टीकेवर विचार करत बसू शकत नाही. माझं काम अभिनय करणे आहे. वाद घालणे हे माझं काम नाही. ", असं देखील चिन्मयने म्हटलं आहे.

Gandhi Godse Ek Yudh
Gandhi Godse Ek Yudh: 'गांधी गोडसे: एक युद्ध', राजकुमार संतोषींच्या सिनेमाचा टीझर प्रदर्शित

राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'गांधी गोडसे- एक युद्ध' या चित्रपटाचा ट्रेलर देखील आज प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर समोर येताच यात महात्मा गांधीजी आणि गोडसे यांच्यातील वाद पाहायला मिळत आहे. संपूर्ण चित्रपटाची एक थोटीशी झलक यात दाखवली आहे. चित्रपटात दीपक अंतानी गांधीजींची भूमिका सारकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com