Shah Rukh Khan Pathaan controversy Instagram @iamsrk
मनोरंजन बातम्या

Pathaan: बेशरम रंगचा वाद, 'पठान' प्रदर्शित होण्याआधी शाहरूख थेट बोलला, म्हणाला...

निर्मात्यांनी व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्याच्या चाहत्यांसोबत 'दिल की बात' शेअर करताना दिसत आहे. तेव्हा त्याने गाण्याबद्दलही खास वक्तव्य केले.

Chetan Bodke

Pathaan: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोनचा 'पठान' चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अवघ्या काही दिवसांवरच चित्रपटाचे प्रदर्शन आल्याने चित्रपटातील कलाकारांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. यापूर्वी पठानचे निर्माते यशराज फिल्म्सने शाहरुख खानचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. व्हिडिओमध्ये शाहरुख खान त्याच्या चाहत्यांसोबत 'दिल की बात' शेअर करताना दिसत आहे.

व्हिडिओ शेअर करताना YRF ने सांगितले की, शाहरुखचे अनेक वर्षांच जुनं स्वप्न 'पठान' या चित्रपटाद्वारे पूर्ण होत आहे. बहु्प्रतिक्षित चित्रपटात शाहरुख अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी प्रमोशनसाठी थेट मुलाखती टाळण्याचा निर्णय घेतला आहे. याच निर्णयावर स्वतः यशराज फिल्म्सने पठानशी संबंधित अनेक प्रश्नांबाबत शाहरुखची मुलाखत प्रसिद्ध केली आहे.

या मुलाखतीत शाहरुखने अनेक प्रश्नांचा उलगडा केला आहे. त्यात त्याने 'बेशरम रंग' या गाण्यावरही चर्चा केली आहे. स्पेनमध्ये बेशरम रंग या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव कसा होता, यावर शाहरुख खान म्हणतो, "आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की, सिद्धार्थ आणि त्यांची टीम शूटिंगसाठी उत्तम लोकेशन्स निवडतात. जरीही मी यापूर्वी स्पेनला गेलो असेल तरी, माझ्यासाठी शूटिंग स्पॉट पूर्णपणे नवीन होते. आम्ही टाईम्स स्क्वेअरमध्ये गाणे शूट केले होते, तेथील ठिकाण खरंच फिरण्यासारखे असल्याने मी आणि माझे परिवार त्या ठिकाणी गेलो होतो."

व्हिडिओमध्ये शाहरुख खानही चित्रपटातील पठानच्या व्यक्तिरेखेबद्दल सांगतो की, "पठान एक साधा व्यक्ती असून तो अनेक गोष्टी कठीण करतो. मला वाटते की तो खोडकर आणि खूप कठोर आहे." असे त्याचे पात्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मराठी एकजुटीच्या द्वेषाची फडणवीसांना कावीळ झाली, सामानाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

WCL मध्ये नोकरी लावून देतो, अकोल्यात २५ जणांना कोट्यवधींना गंडवलं, शिंदेंच्या माजी आमदाराच्या नावाने धमक्या

Success Story: २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; सोशल मीडियावर आहेत लाखो फॉलोवर्स; IPS सचिन अतुलकर आहेत तरी कोण?

Sun Ketu nakshatra transit: 100 वर्षांनी सूर्य केतू एकाच दिवशी करणार नक्षत्र गोचर; 'या' राशींना होणार अचानक धनलाभ

SCROLL FOR NEXT