
Urfi Javed: उर्फी सध्या सोशल मीडियावर कमालीची चर्चेत आली आहे. तिचा आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद आता काही नवीन राहिला नाही. नववर्षाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रा वाघ हात धुवून मागे लागल्या होत्या. चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत तिच्या अटकेची मागणी मुंबई पोलिसांकडे केली होती. पण या वादात उर्फीचे सोशल मीडियावर बरेच फॉलॉअर्स वाढले आहेत. त्या दोघींमधील वाद अद्याप ही संपलेला नाही.
या दोघींमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटर वॉर सुरू आहे. त्यांच्या ट्विटरची चर्चा सध्या सोशल मीडियावर बरीच होत आहे. उर्फीच्या अनेक ट्विटने चाहत्यांचे लक्ष स्वतःकडे वेधले. तिने आणखी एक ट्विट करत आपल्याकडे सर्वांचे लक्ष वेधले.
नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये उर्फीने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचे आभार मानले आहे. या ट्वीटमध्ये उर्फी म्हणते, "रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाचे सत्याच्या मागे ठामपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. कोणत्याही राजकीय पक्षाला हिंसाचार करण्याचा आणि जाहीरपणे कोणालाही मारहाण करण्याचा अधिकार नाही. कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही."
सोबतच आणखी एका ट्वीटमुळे तिची चर्चा होत आहे, "बलात्काराच्या लाखो केसेस पेंडिंग आहेत, मात्र काही राजकारणी मीडियामध्ये येतात आणि उघडपणे धमकी देतात. कारण काय तर तुम्ही कोणते कपडे घालता."
उर्फीचे गेल्या काही दिवसांतील ट्वीट्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कपड्यांमुळे चर्चेत असलेली उर्फी बरीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उर्फीच्या कपड्यांवरून आक्षेप घेत चित्रा वाघ यांनी तिच्या अटकेची मागणी केली होती. यावरून तिची शनिवारी पोलीस स्थानकात चौकशीही झाली होती.
‘उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार. त्यामुळे उर्फीचा हा नंगानाच आम्ही महाराष्ट्रात खपवून घेणार नाही. ही माझी ठाम भूमिका आहे. तुम्हाला काय करायचं ते करा.’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फी हिचा तोकड्या कपड्यांमुळे विरोध केला.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.